Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ-अमृताच्या घटस्फोटावर मुलगी सारा अली खानने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 14:46 IST

माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. माझी आईच माझ्यासाठी सर्वस्व आहे. पापा सैफसह मी संपर्कात असते.

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.यावेळी तिने सैफ अली खान आणि आई अमृता सिंह यांच्या नात्यावरच आपले मत मांडले आहे. सैफ अली खानने त्याच्यापेक्षा 12 वर्षाने मोठी असलेली अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. 1991 मध्ये दोघांनी लग्न केले होते. तर 2004 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत वेगळेही झाले.

पोटगी म्हणून सैफ अली खानला अमृता सिंहला पाच कोटी रुपये द्यावे लागले होते. पोटगीच्या पैशांवरुन सैफ आणि अमृता यांच्यामध्ये वादही झाला होता.घटस्फोटानंतरही बराच काळ सैफ अली खान आपल्या मुलांना भेटू शकला नव्हता, कारण कोर्टाने दोन्ही मुलांचा ताबा आई अमृता सिंहकडे दिला होता.सैफने अमृताला घटस्फोट दिल्यानंतर बॉलिवूडची बेबो करिना कपूरसह  6 ऑक्टोबर 2012 मध्ये दुसरे लग्न करत संसार थाटला.

करिना आणि सैफला दोन मुलं आहेत. तर साराचेही करिना कपूरसह खूप चांगले बॉन्डींग आहे. अनेकदा सैफ करिनाच्या भेटीगाठी घेताना सारा दिसते. एका कार्यक्रमात साराने आता तिच्या आई-वडिलांविषयी प्रतिक्रिया दिली आहे. 

साराने घटस्फोट घेतलेल्या आई वडिलांविषयी सांगितले की, हे इतकंही कठिण नाही. जर दोन व्यक्ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यात वेगळे राहून आनंदी राहणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. यामुळे तुम्ही कधी भेटलेच तर त्या व्यक्तिला भेटून आनंदही होतो. मी माझ्या आईसोबत राहते. माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. माझी आईच माझ्यासाठी सर्वस्व आहे.

पापा सैफसह मी संपर्कात असते. मला जेव्हा वाटते तेव्हा मी त्यांना भेटते. आई-वडिलांना वेगळे होण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता. दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत हेच खूप महत्त्वाचे आहे.

अमृता एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ करते. इतकंच नाहीतर लाईमलाईटमध्येही फारशी नसते. अधून मधून मुलांच्या बर्थ डे सेलिब्रेशनवेळीच अमृता मीडियासमोर दिसते. सिनेमातही ती झळकलेली नाही.अमृता सिंह मुलांसह आपली लाईफ एन्जॉय करताना दिसते.

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान