टायगर श्रॉफला भेटणे आता असेल कठीण! आईने तैनात केले पाच बॉडीगार्ड्स !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 14:47 IST
गत आठवड्यात टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगरने जीवाचे रान केले. अगदी शहरा-शहरात जावून चित्रपट ...
टायगर श्रॉफला भेटणे आता असेल कठीण! आईने तैनात केले पाच बॉडीगार्ड्स !!
गत आठवड्यात टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगरने जीवाचे रान केले. अगदी शहरा-शहरात जावून चित्रपट प्रमोट केला. अर्थात याचा फार काही फायदा झाला नाहीाच. चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. अर्थात जिथे जाईल तिथे चाहत्यांवर टायगरची जादू मात्र चालली. टायगरची लोकप्रियता अलीकडे कमालीची वाढली आहे. ग्लॅमरच्या जगात वावरणारा टायगर यामुळे सुखावला असला तरी त्याच्या आईची चिंता मात्र वाढली आहे.होय, अलीकडे टायगर अहमदाबादला प्रमोशनसाठी गेला तेव्हा तिथे एक घटना घडली. टायगर आपल्या एका बॉडीगार्र्डसोबत तिथे पोहोचताच चाहत्यांनी त्याला घेरले. हा इव्हेंट एका मॉलमध्ये होता. इव्हेंट संपला आणि टायगरचा बॉडीगार्ड कारकडे निघाला. या गर्दीत टायगर काहीसा पिछाडला आणि गर्दीने त्याला घेरले. गर्दी अक्षरश: त्याच्यावर तुटून पडली. टायगरने कसेबसे या गर्दीतून स्वत:ला बाहेर काढले आणि उडी मारत कारमध्ये बसला. गर्दी आणि उडी मारल्याने त्याच्या पाठीला दुखापत झाली. या घटनेमुळे टायगरच्या आईची चिंता आणखीच वाढली. इतकी की, यापुढे पब्लिक अपिअरन्स करायचा नाहीस, असे तिने टायगरला बजावले. केवळ इतकेच नाही मुलासाठी एक नाही, दोन नाही तर पाच पाच बॉडीगार्ड्सची सोय केली. यापुढे टायगरला भेटायचे तर या पाच बॉडीगार्ड्सला पार करून तुम्हाला जावे लागेल. ‘मुन्ना मायकल’नंतर टायगर लवकरच ‘रेम्बो’चे शूटींग सुरु करणार आहे. हॉलिवूड चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक असलेल्या या चित्रपटात टागयर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यानंतर करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये तो दिसणार आहे.