Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या 'क्वीन' सिनेमातील अभिनेत्रीचं निधन, ७६व्या वर्षी नवनींद्र बहल यांनी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:34 IST

लोकप्रिय अभिनेत्री नवनींद्र बहल यांचं निधन झालं आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या.

कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्री नवनींद्र बहल यांचं निधन झालं आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या. नवनींद्र बहल यांचा मुलगा कनु बहल याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

नवनींद्र बहल यांचा फोटो शेअर करत त्यांच्या मुलाने भावनिक पोस्ट लिहिली आहे. "माझी शक्ती, माझा विश्वास, प्रेम, गुरू, मार्गदर्शक, माझं हृदय... अलविदा आई. जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस तोपर्यंत माझे डोळे तुझं हास्य, आणि डोळ्यांना शोधत राहतील. अशीच राहा. माझ्या आत्म्याला ऊर्जा दिल्याबद्दल थँक्यू", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

नवनींद्र बहल यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. इश्कबाज या मालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. काही सिनेमांमध्येही त्या झळकल्या होत्या. ओय लकी लकी ओय, क्वीन, खुफिया, माचिस, सुपर सिंग अशा सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. क्वीन या सिनेमात त्यांनी कंगना रणौतसोबत काम केलं होतं. पाच वर्षांपूर्वीच करोनामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Queen actress Navniindra Behl passes away at 76

Web Summary : Actress Navniindra Behl, known for 'Queen,' passed away at 76. Her son shared the news on social media, expressing his grief. Behl was also known for 'Ishqbaaz' and films like 'Oye Lucky! Lucky Oye!' Her husband passed away five years ago.
टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू