Join us
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षांत इतका बदलाय आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधला ईशान अवस्थी, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 03:30 IST

आमिर खान सारखा सुप्रसिद्ध चेहरा असतानाही बालकलाकाराच्या भूमिकेतील ईशान अवस्थी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.

‘तारे जमीन पर’ या चित्रपटात दर्शील सफारी एक बाल कलाकार म्हणून दिसला. या चित्रपटात दर्शिल सफारीने आमिर खानसोबत काम केले होते, त्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला. त्याची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. आमिर खान सारखा सुप्रसिद्ध चेहरा असतानाही बालकलाकाराच्या भूमिकेतील दर्शील सफारी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. इतकेच नाही तर या चित्रपटातील दर्शिल सफारीचे मंत्रमुग्ध हास्य आणि त्यांच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. दर्शील आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करतो आहे.  आता दर्शिल सफारी खूप मोठा झाला आहे, ज्यामुळे त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

सोशल मीडियावर दर्शील चांगलाच सक्रिय असतो. आपले फोटो आणि व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचे सध्याचे फोटो पाहून तुम्हाला हाच का तो असा प्रश्न पडल्याशिवया राहणार नाही. तारें जमी परमधला निकुंभसरांनी जेवढी जादू इशानवर केली तितकीच जादू दर्शिल आज त्याच्या लूकने रसिकांवर करत आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दर्शीलला 2008 मध्ये सर्वात कमी वयात फिल्मफेरचा बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार देण्यात आला. 'तारे जमीं पर' नंतर दर्शीलनं 'बमबम बोले', 'जोकोमोन', 'मिडनाइट्स चिल्ड्रेन' या चित्रपटांमध्ये काम केलं. दर्शीलनं टीव्ही शो मध्येही काम केलंय. 'सुन यार ट्राय मार' आणि कलर्स टिव्हीचा डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' या टीव्ही शोमध्ये दिसला. तसेच तो काही जाहिरातींमध्येही झळकला.

बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दर्शिल अचानक पडद्यापासून दूर गेला. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा दर्शिलचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही. सध्या तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. . या व्यतिरिक्त मध्यंतरी तो नाटकाचे धडेही घेत होता. याशिवाय त्याने नाटकात कामही केले आहे. 'कॅन आय हेल्प यू' या नाटकात त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :दर्शील सफारीआमिर खान