Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ईशा गुप्ताच्या ओठांना एका रात्रीत झाले तरी काय? ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 15:59 IST

आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ता बदलेली दिसतेय. होय, अगदी एका रात्रीत ईशाचा लूक काहीसा वेगळा ...

आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ईशा गुप्ता बदलेली दिसतेय. होय, अगदी एका रात्रीत ईशाचा लूक काहीसा वेगळा दिसू लागलाय. ईशाने आपले काही ताजे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ईशा कधी नव्हे इतकी चर्चेत आली आहे. होय, जरा बारकाईने बधितल्यावर तुम्हालाही ईशाच्या चेहºयामधील बदल लक्षात येईल. होय, ताज्या फोटोत ईशाचे ओठ आधीपेक्षा वेगळे दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. ईशाने ओठांसोबत काही तरी केलेय, इतके तर चटकन लक्षात येतेय.मात्र ते मेकअप आहे की सर्जरी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईशाकडे सध्या कुठलाही चित्रपट नाही. पण  सोशल मीडियावर ईशा कमालीची सक्रीय असते आणि याद्वारे चर्चेत कसे राहायचे हे ईशाला चांगलेच कळते.ईशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा वादात सापडली आहे. अनेकांनी तिला तिच्या सावळ्या रंगावरून लक्ष्य केले आहे. पण ईशाला याची पर्वा नाही. मला माझ्या रंगावरून लहानपणापासून अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या आहेत. पण मी कधीही असल्या कमेंट्सची पर्वा केली नाही, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.ALSO READ : ​‘या’ व्यक्तिचा प्रचंड तिरस्कार करते ईशा गुप्ता! वाचा, कारण!!काही दिवसांपूर्वी ईशा तिच्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आली होती. यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले गेले होते. यानंतर आक्षेपार्ह कमेंट्स टाळण्यासाठी ईशाने कमेंट सेक्शन ब्लॉक करून टाकले होते.अलीकडे ईशाचा ‘बादशाहो’ रिलीज झाला होता. आत्तापर्यंत ईशाने एकूण ११ चित्रपटांत काम केले आहे. यात ९ हिंदी चित्रपट आहेत. याशिवाय टीव्ही शो सीआयडीमध्येही ती दिसली आहे.‘राज3’मध्ये ईशाने एक न्यूड सीन दिला होता. या सीनमुळे ती चर्चेत आली होती. या एका सीनने तिची इमेज बदलली होती. सन २०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.