Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा गुप्ता आणि एलिना डीक्रूज झाल्या बेस्ट फ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:24 IST

दोन अभिनेत्र्यांमध्ये कधीच चांगली मैत्री असू शकत नाही असा गैरसमज प्रचलित आहे.दोन हीरोईन म्हटल्यावर एकमेकांविषयी हेवा-देवा, जेलसी वाटणे ...

दोन अभिनेत्र्यांमध्ये कधीच चांगली मैत्री असू शकत नाही असा गैरसमज प्रचलित आहे. दोन हीरोईन म्हटल्यावर एकमेकांविषयी हेवा-देवा, जेलसी वाटणे स्वाभाविक आहे मात्र, त्यामुळे मैत्रीच होऊ शकत नाही असे म्हणने जरा अतिच होईल.हाच गैरसमज खोडून दाखवत बॉलीवूडच्या दोन लावण्यवती सध्या एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड झाल्या आहेत. या दोन अभिनेत्र्या म्हणजे ईशा गुप्ता आणि ऐलिना डीक्रूज.दोघींची भेट ‘रुस्तुम’ चित्रपटाच्या सेटवर झाली आणि लगेच घनिष्ठ मैत्री झाली. सेटवर दोघी नेहमी एकत्र असतात. शुटिंग ब्रेकमध्ये दोघी सोबतच जेवण करतात आणि गप्पा मारत बसतात.मग ते ब्युटी टिप्सपासून ते फेव्हरेट डिशबद्दल एकमेकांना सजेशन्स देत असतात. एवढेच नाही तर सेटवर दोघी मिळून इतर कलाकार व तंत्रज्ञांवर प्रँकदेखील करतात.असा ‘दोस्ताना’ खरंच बॉलीवूडमध्ये कमी पाहायला मिळतो. अक्षयकुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.