तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा रंगली होती. ते दोघंही लग्न करणार असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. मात्र, त्याच दरम्यान त्यांचं ब्रेकअप झालं. तमन्ना आणि विजय वर्माच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. पण, आता तमन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
विजय वर्माचं नाव बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं जात आहे. विजय वर्मा आणि फातिमाला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. एका कॅफेमध्ये विजय वर्मा आणि फातिमा शेखला स्पॉट करण्यात आलं आहे. पण, अद्याप विजय वर्मा किंवा फातिमाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्या दोघांनाही यावर मौन बाळगणं पसंत केलं आहे.
विजय वर्मा आणि फातिमा शेख 'गुस्ताख इश्क' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. दरम्यान, विजय वर्माआधी फातिमाचं नाव आमिर खानसोबत जोडलं गेलं होतं. फातिमाला दंगल सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. आमिरने किरण रावशी घटस्फोट घेतल्यानंतर तो फातिमाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.