बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींचे लोकप्रिय अभिनेत्यांसोबत अफेअर आहेत, अशा चर्चा रंगत असतात. अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचं अभिनेता इब्राहिम अली खानसोबत अफेअर आहे, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याबद्दल पलक आणि इब्राहिमने कधीच जाहीर खुलासा केला नाही. परंतु आता या प्रकरणावर पलकची आई अर्थात अभिनेत्री श्वेता तिवारीने मौन सोडलंय. मुलीच्या अफेअरच्या चर्चांबद्दल काय म्हणाली श्वेता?
काय म्हणाली श्वेता तिवारी?
श्वेता तिवारीने एका मुलाखतीत मुलीच्या डेटिंगच्या चर्चांबद्दल मौन सोडलंय. श्वेता म्हणाली, ''मला भीती वाटते या बातम्यांबद्दल, कारण ती अजून खूप लहान आहे. लोक कधी तिच्याबद्दल काय वाईट लिहितील, याची मला धास्ती आहे. लोक खूप विचित्र लिहितात. प्रत्येक क्षणी तिचं एका मुलासोबत अफेअर आहे, अशा बातम्या येतात. या सर्व गोष्टी ती किती वेळ सहन करेल? एका क्षणी तिचा उद्रेक होईल, अशी तिची आई म्हणून मला काळजी असते.''
श्वेता पुढे म्हणाली, ''तिने तिच्या लव्ह लाईफबद्दल कधी खुलासा केला नाही. जेव्हा अशी एखादी बातमी येते तेव्हा मी अशा कोणत्याही मुलाला डेट करत नाहीये, असं ती प्रांजळपणे कबूल करते. पलकलाच त्या मुलाला विचारावं लागेल की, मी खरंच तुला डेट करत आहे का? ती त्या मुलाला कधी भेटलेली नसते. कधी कधी लोक काही गोष्टी मस्करीत बोलतात. परंतु या गोष्टीचा कधी त्रासही होतो, याची मला जाणीव आहे.'' अशाप्रकारे श्वेताने मुलगी पलकबद्दल खास खुलासा केलाय.