Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खानसोबत लग्न झाल्यावर करीना कपूर रोजा ठेवते? अभिनेत्री म्हणाली- "मला भूक लागते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:59 IST

चाहत्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न येतो की, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूर सुद्धा रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात 'खान' हे आडनाव नक्कीच जोडले आहे.

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतचे सर्व सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपापल्या इफ्तार आणि रोजाचे फोटो शेअर करत आहेत. अशातच चाहत्यांच्या मनात वारंवार एक प्रश्न येतो की, सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीना कपूर सुद्धा रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात 'खान' हे आडनाव नक्कीच जोडले आहे, मात्र ती रमजानच्या महिन्यात रोजा ठेवते की नाही, या गोष्टीचा खुलासा खुद्द करीनाने एका मुलाखतीदरम्यान केला होता.

करीना कपूरने आपल्या भूमिकेबद्दल मोकळेपणाने सांगताना म्हटले, "मी रोजा ठेवत नाही, कारण मला आजही त्याचे योग्य नियम आणि पद्धती माहित नाहीत आणि मला काहीही चुकीचे करायचे नाही. माझे लग्न एका मुस्लिम कुटुंबात झाले आहे. माझे पती सैफ अली खान रोजा ठेवतात, पण त्यांनी मला यासाठी कधीही सक्ती केली नाही. मला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला खूप आवडतात आणि मी दिवसाचे २४ तास काही ना काही खात असते. मला खूप भूक लागते, अशा परिस्थितीत मी रोजा ठेवू शकत नाही."

करीना कपूर स्वतः एका पंजाबी कुटुंबातील असून तिने २०१२ मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. विशेष म्हणजे, हिंदू किंवा मुस्लीम पद्धतीने लग्न न करता करीना आणि सैफने कायदेशीररीत्या कोर्ट मॅरेज करण्याला पसंती दिली होती.  करीना कपूरच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच मेघना गुलजार दिग्दर्शित 'दायरा' या क्राईम-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

याव्यतिरिक्त, तिच्या सुपरहिट ठरलेल्या 'क्रू' चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच 'क्रू २' देखील पाइपलाइनमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, ती राहुल ढोलकिया यांच्या एका अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटात आणि हुसैन दलाल यांच्या चित्रपटातही काम करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Does Kareena Kapoor fast after marrying Saif? Actress reveals truth.

Web Summary : Kareena Kapoor, married to Saif Ali Khan, clarifies she doesn't fast during Ramadan. She cites unfamiliarity with proper rituals and constant hunger as reasons. While Saif observes Roza, he never forces it on her. Kareena, from a Punjabi family, enjoys diverse foods and is currently working on multiple film projects.
टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडमुस्लीमरमजानरमजान ईद