Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय लीला भन्सालींचा ‘लव्ह अँड वॉर’ २०२७मध्ये प्रदर्शित होणार? आलिया-विकी-रणबीरच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:48 IST

बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण, हा सिनेमा २०२६ नव्हे तर २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात होतं. सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याने चाहतेही नाराज झाले होते. 

बॉलिवूडमधील बिग बजेट सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. २०२६ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी भन्सालींचा ‘लव्ह अँड वॉर’ हा सिनेमा एक आहे. हा एक भव्य ऐतिहासिक ड्रामा असून, या चित्रपटात पहिल्यांदाच आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशल हे तिघेही प्रमुख भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. भव्य सेट्स, दमदार कोरिओग्राफी आणि भावस्पर्शी संगीतासाठी ओळखले जाणारे भंसाली या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या तयारीत आहेत. पण, हा सिनेमा २०२६ नव्हे तर २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात होतं. सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याने चाहतेही नाराज झाले होते. 

पण, यावर आता चित्रपटाच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या अफवा खोट्या असल्याचं म्हटलं गेलं आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २०१६ मध्येच प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साली यांनी नुकतेच चित्रपटातील एक गाणे शूट केले असून, चित्रपटातील बहुतांश महत्त्वाचे सीन आधीच शूट झाले आहेत. चित्रपटाचे पहिलं गाणं २० जानेवारीपासून गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूट होणार असून, त्यात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशल एकत्र दिसतील. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य करणार असून, हा हाय-एनर्जी ट्रॅक भंसालींच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये साकारला जाणार आहे. 

याशिवाय, दुसरं गाणं फेब्रुवारीमध्ये श्यामक डावर यांच्या कोरिओग्राफीखाली शूट होणार असून ते पहिल्यापेक्षा अधिक भव्य आणि प्रयोगशील असेल. युद्धकाळातील प्रेमत्रिकोणाची भावनिक खोली अधिक ठळकपणे मांडणारे हे गाणं ठरणार आहे. या सर्व संगीतात्मक ट्रॅक्समुळे ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २०२६मधील एक मोठा सिनेमॅटिक इव्हेंट मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Leela Bhansali's 'Love and War' to release in 2026.

Web Summary : Sanjay Leela Bhansali's 'Love and War,' starring Alia, Ranbir, and Vicky, is on track for a 2026 release, dismissing 2027 rumors. Shooting is underway, with songs choreographed by Ganesh Acharya and Shiamak Davar promising a grand cinematic event.
टॅग्स :संजय लीला भन्साळीआलिया भटरणबीर कपूरविकी कौशल