सुहाना खान, खुशी कपूर, राशा थडानी, इब्राहिम खान यांच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आता अजय देवगणची लेक नीसा देवगण बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल असण्याबरोबरच उत्तम कलाकारही आहे. या दोघांनीही अभिनयाने ९०चा काळ गाजवला. एवढंच नव्हे तर आजही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता इतर स्टारकिड्सप्रमाणे नीसादेखील अभिनयात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.
नीसाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने प्रतिक्रिया दिली आहे. काजोलने एका इवेंटमध्ये यावर भाष्य केलं. नीसाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत विचारताच ती म्हणाली, "अजिबातच नाही...मला वाटत नाही की ती करेल. ती आता २२ वर्षांची होणार आहे. मला वाटतं की इंडस्ट्रीत न येण्याचा निर्णय तिने घेतला आहे".
इंडस्ट्रीत येणाऱ्या तरुणांनाही काजोलने मोलाचा सल्ला दिला. "पहिलं तर मी त्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाकडून सल्ला घेऊ नका. तुम्ही जर कोणाला विचारलं की मला काय करायला हवं. तर १०० लोक तुम्हाला सल्ले द्यायला येतील. आणि तुम्ही नाक बदललं पाहिजे, हात बदलण्याची गरज आहे, केसांचा रंग बदल...हे कर ते कर...असं सांगतील. तेच लोक लक्षात राहतात जे हजारोंच्या गर्दीसोबत चालण्यापेक्षा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात", असंही तिने सांगितलं.