Join us

​इरफानचा प्रश्न : सलमानचा रेप झाला आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 22:53 IST

सलमान खानचे ‘रेप्ड वूमन’ वक्तव्य असंवेदनशील होते, असेच बॉलिवूडमधील अनेकांचे मत आहे. कंगना रानोटपासून ‘सुलतान’मध्ये सलमानची को-स्टार असलेल्या अनुष्का ...

सलमान खानचे ‘रेप्ड वूमन’ वक्तव्य असंवेदनशील होते, असेच बॉलिवूडमधील अनेकांचे मत आहे. कंगना रानोटपासून ‘सुलतान’मध्ये सलमानची को-स्टार असलेल्या अनुष्का शर्मापर्यंत अनेकांनी सलमानचे हे वक्तव्य म्हणजे असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. आता यात इरफान खान याच्याही नावाची भर पडली आहे. एका आॅनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान इरफानला याबाबत विचारण्यात आले. सलमानच्या ‘रेप्ड वूमन’ वक्तव्यासंदर्भात तुझी काय प्रतिक्रिया आहे? असा प्रश्न इरफानला केला गेला. यावर, सलमानचा रेप झाला आहे का? असा प्रतिप्रश्न इरफानने केला. अर्थात काहीच क्षणात  भानावर येत, इरफान सारवासारव करताना दिसला. हा वाद आता जुना झाला आहे. सुलतान रिलीजही झाला आहे, असे म्हणत त्याने या प्रश्नावर अधिक काही बोलणे टाळले.