Join us

इरफान खानच्या सिनेमावर बांग्लादेशात बॅन, मधूर भंडारकरच्या डोळ्यात तरळले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 19:15 IST

अभिनेता इरफान खान याच्या ‘नो बेड आॅफ रोजेस’ या सिनेमाला सेंसर बोर्डाने ग्रीन कार्ड दिले असतानाही बांग्लादेशात सिनेमावर बॅन लावण्यात आल्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अभिनेता इरफान खान याच्या ‘नो बेड आॅफ रोजेस’ या सिनेमाला सेंसर बोर्डाने ग्रीन कार्ड दिले असतानाही बांग्लादेशात सिनेमावर बॅन लावण्यात आल्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधूर भंडारकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हे खूपच दुखदायक असून, माझ्या निर्मात्यांप्रती सहानुभूती असल्याचे त्याने म्हटले. सातव्या राष्ट्रीय विज्ञान फिल्म महोत्सवादरम्यान मधूर भंडारकर यांना जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी याच निर्मात्यांच्या  ‘कॅलेंडर ग्लर्स’ या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती, असे सांगितले. एकीकडे आपण उदात्तीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी चर्चा करतो. जग खूप बदलले, असेही म्हणतो. परंतु जेव्हा अशाप्रकारे एखाद्या सिनेमावर बंदी घातली जाते तेव्हा खूपच दु:ख होते. इरफान खान हा एक प्रतिभाशाली अभिनेता असून, बांग्लादेशात त्याच्या चाहत्यांची संख्या भरपूर आहे. अशाप्रकारे सिनेमावर बंदी घातल्याने दिग्दर्शक मुस्तफा सरवर फारुकी यांच्यासह अभिनेता इरफान नाराज असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. ‘नो बेड आॅफ रोजेस’ हा सिनेमा बांग्लादेशी लेखक आणि निर्माता हुमायूं अहमद यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी तब्बल २७ वर्षेेसंसार केलेल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्यापेक्षा वयाने ३३ वर्षे लहान असलेल्या एका अभिनेत्रीशी विवाह केला होता. हा सिनेमा म्हणजे हुमायूं अहमद यांची बायोपिक असल्याचे म्हटले जात आहे. परंतु निर्मात्यांनाही नसल्याचे स्पष्ट शब्दात नाकारले असतानाही यावर बॅन लावण्यात आला आहे. यावर भंडारकर यांनी सांगितले की, सिनेमाची कथा काय आहे हे मला माहीत नाही, परंतु सेंसर बोर्डाने ग्रीन कार्ड दिल्यानंतर अशाप्रकारे बॅन लावणे निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.