दिवंगत अभिनेते इरफान खान आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा २५ वर्षांपूर्वीचा 'द लास्ट टेनंट' (The Last Tenant) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल २५ वर्ष हा चित्रपट रखडला होता. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इरफान खान आज आपल्यात नसले तरीही चित्रपटाच्या टीमने सुरुवातीलाच त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. कुठे बघू शकता हा सिनेमा? जाणून घ्याइरफान खान यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आजवर रिलीज न झालेला हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी चित्रीकरण झालेल्या या चित्रपटात इरफान खान आणि विद्या बालन झळकले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सार्थक दासगुप्ता आहे.'द लास्ट टेनंट' हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या विनामूल्य पाहता येणार आहे. २९ एप्रिल रोजी हा चित्रपट 'The Salt Inc' या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. विद्या बालनच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक असून, काही रिपोर्ट्सनुसार हा तिचा पहिला चित्रपट देखील असू शकतो. विशेष म्हणजे, इरफान खान आणि विद्या बालन यांनी एकत्र काम केलेला हा एकमेव चित्रपट आहे.
२५ वर्षांनंतर का झाला प्रदर्शित?या चित्रपटाचे मूळ फुटेज हरवल्यामुळे तो दोन दशकांहून अधिक काळ प्रदर्शित होऊ शकला नव्हता. नंतर दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांना याची एक 'VHS' (व्हिडिओ होम सिस्टम) कॉपी मिळाली, ज्यावरून हा चित्रपट पुन्हा तयार करून प्रदर्शित करण्यात आला. सार्थक दासगुप्ता यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात इरफान आणि विद्यासह अनु खंडेलवाल, सौरभ अग्रवाल, सब्यसाची, सतीश कालरा आणि आनंद मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.
Web Summary : Irfan Khan and Vidya Balan's unreleased film, 'The Last Tenant,' is now available on YouTube after 25 years. Directed by Sarthak Dasgupta, the film was lost but rediscovered on VHS. It's a rare collaboration between the acclaimed actors, free to watch.
Web Summary : इरफान खान और विद्या बालन की फिल्म 'द लास्ट टेनंट' 25 साल बाद यूट्यूब पर रिलीज हुई। सार्थक दासगुप्ता द्वारा निर्देशित, यह फिल्म खो गई थी, लेकिन वीएचएस पर मिली। यह फिल्म मुफ्त में देखने के लिए उपलब्ध है।