Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सबा बनणार इरफानची हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 17:10 IST

इरफान खानला गेल्या अनेक दिवसांपासून एका सुंदर चेहºयाचा शोध होता. अखेर अख्खे बॉलिवूड पालथे घातल्यानंतर इरफानला हा सुंदर चेहरा ...

इरफान खानला गेल्या अनेक दिवसांपासून एका सुंदर चेहºयाचा शोध होता. अखेर अख्खे बॉलिवूड पालथे घातल्यानंतर इरफानला हा सुंदर चेहरा मिळाला. पण बॉलिवूडमध्ये नाही तर पाकिस्तानात. निर्माते दिनेश विजन सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहेत. यासाठी त्यांनी इरफान खानला हिरो म्हणून निवडला आहे.विजन यांना इरफानच्या अपोझिट एका नव्या चेहºयाचा शोध होता. अखेर त्यांचा शोध पूर्ण झाला तो सबा कमरच्या रूपात. होय, सबा कमर हीविजन यांच्या चित्रपटात इरफानच्या अपोझिट दिसणार आहे.   ‘शादी के साईड इफेक्ट्स’ सारखा चित्रपट बनवणारे साकेत या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहे. पाकिस्तानातील चित्रपट आणि टीव्ही जगतातील गाजलेला चेहरा म्हणजे सबा कमर. विजन व साकेत यांच्यासोबत काम करण्यास सबा अतिशय उत्साहित आहे. तेव्हा ही सबा कोण, कुठली, जाणून घेऊ यात...करिअर :सबा ने ‘मंटो’पासून पाकिस्तानात आपल्या अभिनयातील करिअरची सुरुवात केली होती. यातील तिच्या अभियनाला बरीच दाद मिळाली. पाकिस्तानी ‘हम’टीव्हीवरील मालिकांमध्येही सबा दिसली आहे. मॉडेलिंगमध्येही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सबा बॉलिवूडमधील ग्रँड डेब्युसाठी तयार आहे. ‘मंटो’ या चित्रपटात सबाने नूर ही व्यक्तिरेखा साकारली होती.२०१० मध्ये सबाने ‘पीटीव्ही’च्या ‘जिना के नाम’ या मालिकेत राजकारणी महिलेची भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘तेरा प्यार नहीं भूलें’ या रोमॅन्टिक ड्रामात अहसन खानच्या अपोझिट दिसली. ‘पानी जैसा प्यार’, ‘मैं चांद सी’ आणि ‘थकान’ यासारख्या मालिकांमध्ये सबा दिसली. ‘हम’ टीव्ही वरील ‘कैसे तुम से कहंू’ आणि ‘संगत’ या दोन मालिकांनी सबाला अपार लोकप्रीयता मिळवून दिली. २०१५ मध्ये आलेल्या या मालिका पाकिस्तानात चांगल्याच गाजल्या.मालिकांनी दिली ओळख : ‘मैं औरत हू’ या टेलिव्हिजन सेरिजमध्ये सबा पहिल्यांदा झळकली.  बेस्ट टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचा पीटीव्ही अवार्ड आपल्या नावावर केल्यानंतरतिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘मात’,‘बन्टी आय लव्ह यू’, ‘बेईमान मोहब्बत’, ‘सन्नाटा’ अशा अनेक मालिकांमधून सबा दिसली आणि पाकिस्तानातील प्रेक्षकांनी तिला पसंत केले. मालिकांमध्ये नाव कमावल्यानंतर मोठ्या पडद्यावरच्या आॅफर्स सबाकडे यायला लागल्या. शरर्माद सुल्तान खूसत यांच्या ‘मैं मंटो’ यात ती दिसली.  बॉलिवूड डेब्यू: मला बॉलिवूडमध्ये काहीही इंटरेस्ट नाही, अशी सबा आधी म्हणायची. पण हीच सबानंतर बॉलिवूडचे गोडवे गायला लागली. याआधी रणदीप हुडाच्या अपोझिट आलेली एक आॅफर्स सबाने धुडकावून लावल्याचे वृत्त आहे. पण आता इरफान खानच्या अपोझिट काम करण्यास सबा राजी झाली आहे. इरफान प्रतिभावंत अभिनेता आहे आणि त्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे,असे सबा म्हणतेय...तेव्हा आॅल दी बेस्ट सबा...