Join us

‘राजा हिंदुस्तानी’चा किसींग सीन देताना अशी झाली होती करिश्मा कपूरची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 08:00 IST

इतक्या वर्षांनंतर खुद्द करिश्माने केला खुलासा

ठळक मुद्दे‘राजा हिंदुस्तानी’ हा 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा होता.

90 च्या दशकात सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री करिश्मा कपूर दीर्घकाळानंतर डिजीटल डेब्यू करतेय. ‘मेंटलहुड’ या वेबसीरिजमध्ये ती झळणार आहे. या वेबसीरिजद्वारे करिश्मा अनेक वर्षांनंतर कमबॅक करतेय. साहजिकच करिश्माचे चाहते उत्सुक आहेत. सध्या करिश्मा या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनचाच एक भाग असलेली तिची एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. होय, राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत करिश्माने असा काही खुलासा केला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

हा खुलासा आहे, 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाबद्दलचा. या चित्रपटात आमिर खानकरिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. या चित्रपटातील आमिर व करिश्माचा एक किसींग सीन चांगलाच गाजला होता. करिश्माने याच किसींग सीनबद्दल मोठा खुलासा केला.

तिने सांगितले, ‘राजा हिंदुस्तानी या चित्रपटाबद्दलच्या अनेक आठवणीत आहे. पण हा चित्रपट रिलीज झाल्यावर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती यातील किसींग सीनची. पण हा सीन शूट करायला आम्हाला तीन दिवस लागले होते, हे कदाचित लोकांना माहित नाही. फेब्रुवारी महिन्यात उटीत कडाक्याची थंडी होती आणि या कडाक्याच्या थंडीत संध्याकाळी 6 वाजता हा सीन शूट केला गेला होता. मी थंडीने अक्षरश: कुडकुडत होते आणि तशास्थितीत मी हा सीन दिला होता. कधी एकदा हा सीन संपतो, असे मला झाले होते.’

‘राजा हिंदुस्तानी’ हा 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर सिनेमा होता. सध्याच्या चित्रपटात किसींग  ही बाब कॉमन आहे. मात्र त्याकाळात अशा सीन्सची प्रचंड चर्चा व्हायची. आमिरने राजा हिंदुस्तानी, दिल,  इश्क, मन,  रंग दे बसंती,  थ्री इडियट  या चित्रपटांमध्ये  लिप लॉक सीन्स दिले आहेत.

टॅग्स :करिश्मा कपूरआमिर खान