Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरासोबत लग्न करण्याच्या चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिले मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 10:04 IST

अर्जुन कपूरला एका लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं मलायकाशी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सगळेच घरात कैद आहेत. त्यामुळे नेहमी शूटिंगमध्ये व्यग्र असणारे सेलिब्रेटींकडे देखील सध्या खूपच रिकामा वेळ आहे. त्यामुळे सध्या सगळेच सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अशात अभिनेता अर्जुन कपूरला एका लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं मलायकाशी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावर अर्जुनने मजेशीर उत्तर दिले.बॉलिवूड हंगामाशी झालेल्या लाइव्ह चॅट सेशनमध्ये अर्जुननं त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले. या लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं विचारलं गर्लफ्रेंड मलायकाशी लग्न कधी करणार आहे. यावर अर्जुनने उत्तर देताना सांगितले की, जेव्हा मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नक्की सांगेन. सध्या तरी काही प्लान नाही आहे आणि समजा असेलच तरीही आता कसं लग्न करणार? सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हा लग्न करायचं असेल तर कोणापासून काहीही लपवणार नाही.

मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या चर्चांना अनेकवेळा उधाण आले आहे. मात्र अर्जुनने अद्याप तरी मलायकाशी लग्न करण्याचा कोणताही प्लान नाही हे स्पष्ट केले आहे.

अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर