Inside pics: करिश्मा कपूरचा ex-husband संजय कपूर आणि प्रिया सचदेवचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 11:15 IST
करिश्मा कपूरचा एक्स हसबण्ड संजय कपूर आणि दिल्लीची फॅशनिस्टा व मॉडेल प्रिया सचदेव आठवडाभरापूर्वी (१३ एप्रिल) लग्नबंधनात अडकले. अगदी ...
Inside pics: करिश्मा कपूरचा ex-husband संजय कपूर आणि प्रिया सचदेवचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन!
करिश्मा कपूरचा एक्स हसबण्ड संजय कपूर आणि दिल्लीची फॅशनिस्टा व मॉडेल प्रिया सचदेव आठवडाभरापूर्वी (१३ एप्रिल) लग्नबंधनात अडकले. अगदी काही मोजक्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न झाले. पण यानंतर रिसेप्शन मात्र अगदी धूमधडाक्यात झाले. संजय कपूर व प्रिया सचदेवच्या या ग्रॅण्ड रिसेप्शनचे काही फोटो समोर आले आहेत. लग्नानंतर संजय कपूरने न्यूयॉर्कमधील एका अलिशान हॉटेलात ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. यावेळी दोघांचेही जवळचे मित्र, कुटुंबीय हजर होते. या पार्टीत संजय व प्रिया या दोघांचाही रॉयल अंदाज एकदम बघण्यासारखा होता. या पार्टीच्या फोटोंमध्ये दोघेही अगदी परफेक्ट दिसताहेत. प्रियाने पांढºया रंगाचा गाऊन घातलेला आहे तर संजयने बंद गळ्याचा कोट परिधान केला आहे. यावेळी संजयचे शूज सगळ्यांत हटके दिसले. त्याच्या या आगळ्या- वेगळ्या शूजनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘आय डू’ असे त्याच्या या शूजवर लिहिलेले होते. या ग्रँड रिसेप्शन पार्टीत संजय व प्रियाने भलामोठा केक कापत आनंद साजरा केला. या पार्टीत संजय व प्रिया दोघांनी आपल्या भावनाही बोलून दाखवल्या. या पार्टीला हजर असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यावेळी अतिशय आनंदात होता. होय, हे माझे तिसरे लग्न आहे, असे त्याने यावेळी मोठ्या अभिमानाने सांगितले. संजयची पहिली पत्नी नंदिता महतानी ही फॅशन डिझाईनर होती. यानंतर नंदिताला घटस्फोट देऊन संजयने करिश्मा कपूरशी लग्न केले होते. करिश्माने गेल्या वर्षी दिल्ली संजय कपूर याच्याशी घटस्फोट घेतला होता. तब्बल १३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांची दोन मुले आहेत. प्रिया सचदेव हिचेही हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने इंडियन- अमेरिकन बिझनेसमन विक्रम चटवालशी लग्न केले हरेते. प्रिया हिला एक मुलगीही आहे.ALSO READ : करिश्मा कपूरचा ‘कथित’ बॉयफ्रेंड संदीप तोष्णिवाल बनला कपूर खानदानाचा सदस्य?