Join us

SEE PICS : आलिया भट सध्या कुठे आहे? गर्लगँगसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 11:51 IST

आलियाच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका डान्स व्हिडीओही इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

ठळक मुद्देआलियाच्या वर्कफ्रंट सांगायचे तर एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे तिने साईन केले आहेत.

आलिया भट सध्या कुठे आहे तर तिच्या गर्लगँगसोबत मालदीव येथे व्हॅकेशन एन्जॉय करतेय. होय, सध्या आलियाच्या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर मालदीवच्या समुद्र किनाºयावर थिरकतानाचा या गर्लगँगच्या एका व्हिडीओही इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

बहिण शाहिन तसेच अनुष्का व आकांक्षा रंजन या मैत्रिणींसोबत आलिया मालदीव व्हॅकेशनवर गेली आहे. आलियाने या व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. आकांक्षानेही या व्हॅकेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट केले आहेत.

मालदीव निळाशार समुद्र किनारा आणि गर्लगँगसोबत आलियाची धम्माल मस्ती पाहण्यासारखी आहे. अलीकडे आलियाला कामाच्या ताणामुळे रूग्णालयात भरती करावे लागले होते.

सततच्या शूटींगमुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. कामाचा हा ताण दूर करण्यासाठीच आलिया गर्लगँगसोबत सुट्टीचा प्लान बनवला असावा. फोटो पाहून तरी आलियाचा सर्व ताण संपलेला दिसतोय.

  आलियाच्या वर्कफ्रंट सांगायचे तर एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे तिने साईन केले आहेत. बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. करोना व्हायरसमुळे हा चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही.

याशिवाय   संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात ती लीड भूमिकेत दिसणार आहे. बाहुबली फेम एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.

यात ती साऊथ सुपरस्टार ज्यूनिअर एनटीआर, रामचरणसोबत दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हाही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :आलिया भट