Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल रॉयच्या लग्नाबद्दलची ती माहिती चुकीची, बॅचलर नसून आहे घटस्फोटीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:37 IST

'आशिकी' या सिनेमात राहुल रॉय, अनू अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 30 वर्षं नुकतेच झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील तरूणींच्या दिलों की धडकन आणि हँडसम असा लौकिक मिळवणारा अभिनेता म्हणजे राहुल रॉय. राहुल आणि आणि अनू अग्रवाल यांचा 'आशिकी' हा सिनेमा नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या सिनेमातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या सिनेमाला आज अनेक वर्षं झाली असली तरी गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. या सिनेमात राहुल रॉय, अनू अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 30 वर्षं नुकतेच झाले. याच निमित्ताने सिनेमाच्या स्टारकास्टने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी या सिनेमानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलत गेले, कोणत्या कोणत्या गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. कशारितीन त्यांच्यासाठी काळ बदलत गेला या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच इतक्या उघडपणे मांडल्या. 

 

यांत कपिलने राहुल रॉयला त्याच्या खाजगी आयुष्याशी संबंधीत एक प्रश्न विचारला. “राहुल सर तुमचा ‘जूनून’ हा माझा सर्वात आवडता सिनेमा आहे. या सिनेमा तुम्ही रोज रात्री वाघाचं रुप घेता. कदाचित हेच तर तुमच्या बॅचलर असण्याचं कारण तर नाही ना?” या प्रश्नावर राहुलनेही जास्त न बोलता “या गुप्त गोष्टीला गुप्तच राहू दे.” म्हणत वेळ मारून नेली.

 

 

 

मात्र या मुलाखतीमुळे राहुल रॉय अद्याप बॅचलर आहे हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे. पण ही माहिती संपूर्णपणे चुकीची आहे. मुळात राहुल रॉयने 2000 मध्ये  मॉडल राजलक्ष्मी खानविलकरसह लग्न केले होते. दोन वर्षाच्या अफेअरनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. राजलक्ष्मीचे हे दुसरे लग्न होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्यातही खटके उडू लागले आणि दोघांनी घटस्फोट घेतला.   

 

टॅग्स :राहुल रॉय