Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांचे डोळे सुंदर -अथिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:50 IST

भारतीय महिलांचे डोळे सुंदर -अथियाभारतीय महिलांचे डोळे खुपच सुंदर असतात. जन्मजातच त्यांच्या डोळ्यांमध्ये एक सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास असतो. ...

भारतीय महिलांचे डोळे सुंदर -अथियाभारतीय महिलांचे डोळे खुपच सुंदर असतात. जन्मजातच त्यांच्या डोळ्यांमध्ये एक सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास असतो. बदामाच्या आकाराप्रमाणे त्यांचे असलेले डोळे दैवी छाया असल्यासारखे वाटतात, असे 'हिरो' फेम अथिया शेट्टी म्हणाली. अथिया तिचे काही अनुभव शेअर करताना ती म्हणते,' मी जेव्हा शूटिंगला जाते तेव्हा मला डोळ्याला मस्कारा वापरल्याशिवाय बाहेर पडताच येत नाही. त्याच्यामुळे माझ्या डोळयांना एक चकाकी येते. माझ्या केसांसाठी सुद्धा आजी माझ्या केसांना रविवारी आजही खोबरेल तेल लावून देते. त्यामुळे माझे केस एवढे चांगले आहेत अजूनही. कोणत्याही स्पाची माझ्या केसांना गरज नाही.