इंडियन बॉक्सआॅफिसवर हॉलिवूडपटांचा दबदबा! सात महिन्यांत तिस-यांदा बॉलिवूडपटांवर मात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:11 IST
गत आठवड्यात रिलीज झालेला नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. गत चार दिवसांत ...
इंडियन बॉक्सआॅफिसवर हॉलिवूडपटांचा दबदबा! सात महिन्यांत तिस-यांदा बॉलिवूडपटांवर मात!!
गत आठवड्यात रिलीज झालेला नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. गत चार दिवसांत या चित्रपटाने केवळ १३.१९ कोटींचा गल्ला जमवला. याऊलट ‘अय्यारी’सोबत रिलीज झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ या हॉलिवूड चित्रपटाने मात्र इंडियन बॉक्सआॅफिसवर कमाल आत्तापर्यंत २९ कोटी कमावले. ‘ब्लॅक पँथर’मुळे काही प्रमाणात अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटालाही नुकसान सोसावे लागले. अर्थात हे पहिल्यांदा घडलेले नाही. गेल्या सात महिन्यांत हॉलिवूडपटांनी बॉलिवूडपटांवर मात करण्याची ही तिसरी वेळ आहे. ताजे उदाहरण‘ब्लॅक पँथर’चेच आहे. त्याआधी ‘इट’ आणि ‘एनाबेल’ या हॉलिवूडच्या हॉररपटांनी इंडियन बॉक्सआॅफिसवर बॉलिवूड चित्रपटांना धूळ चारली.‘इट’ हा हॉलिवूडपट गतवर्षी ८ डिसेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात चांगलाच बिझनेस केला. ‘इट’ सोबत अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ आणि देओल बदर्सचा ‘पोस्टर बॉयज’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. पण ‘इट’ने या दोन्ही हिंदी चित्रपटांना धोबीपछाड देत, आपला दबदबा निर्माण केला. खरे तर ‘डॅडी’कडून मेकर्सला बºयाच अपेक्षा होत्या. पण या चित्रपटाचा ‘इट’ समोर टिकाव लागला नाही. भारतीय प्रेक्षकांनी ‘इट’ला अधिक पसंती दिली. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने १२ कोटी कमावले. परिणामी ‘डॅडी’ अन् ‘पोस्टर बॉयज’ दोन्ही दणकून आपटले.ALSO READ : Padmavat Box Office Collection : ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’ला स्थान; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन!त्याआधी आॅगस्ट महिन्यात म्हणजे १८ आॅगस्ट २०१७ रोजी ‘एनाबेल’ हा हॉॅलिवूडपट रिलीज झाला. हॉलिवूडच्या या हॉररपटासोबत राजकुमार राव, आयुष्यमान खुराणा आणि क्रिती सॅननचा ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट रिलीज झाला होता. ‘बरेली की बर्फी’ला समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंती दिली. पण ओपनिंग डे कलेक्शनचे म्हणाल तर ‘बरेली की बर्फी’ला ‘एनाबेल’च्या तुलनेत फार कमी प्रेक्षक मिळाले. रिलीजनंतरच्या दुसºया शुक्रवारपर्यंत ‘ऐनाबेल’ने ३७.९५ कोटी कमावले. याऊलट ‘बरेली की बर्फी’ने पाच दिवसांत केवळ १५.४२ कोटी कमावले.