भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या विश्वविजयानंतर देशभरात क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष साजरा केला जात असून बॉलिवूडमध्येही उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
सुपरस्टार शाहरुख खानने टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करताना लिहिले, "किती जबरदस्त विजय!! आमच्या 'ब्लू मेन'चे अभिनंदन!!! तुम्ही सर्वजण चॅम्पियन्स आहात. तुम्हाला मैदानावर खेळताना पाहून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. तुमचे खूप आभारा. जय हिंद!"
अक्षय कुमारने आपल्या आगामी 'भूत बांगला' चित्रपटातील डान्सचा एक मजेदार GIF शेअर करत म्हटले, "प्रत्येक घरात उत्सवाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप घरी आणल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन!".
अहमदाबादच्या स्टेडियममध्ये सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये अचानक आपला भाऊ अपारशक्ती खुराना दिसल्याने अभिनेता आयुषमान खुरानाला आश्चर्याचा धक्का बसला. आयुषमानने फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला. त्यानं लिहलं, "अहमदाबादचा शाप अखेर तुटला आहे! खऱ्या विजेत्यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला". विशेष म्हणजे, भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारे तिन्ही कर्णधार— एम.एस. धोनी (MSD), रोहित शर्मा (Ro) आणि सूर्यकुमार यादव (Sky) आज मैदानावर उपस्थित होते, ज्याचा उल्लेख करत आयुषमानने या विजयाला 'ऐतिहासिक' म्हटले आहे.
सोनू सूदने लिहिले, "स्कोअरबोर्ड काहीही म्हणो... माझे मन आधीच आनंद साजरा करत आहे. टीम इंडियाचे अभिनंदन, पुन्हा एकदा चॅम्पियन!".
अजय देवगणने भावना व्यक्त करताना लिहिले, "ओरडून-ओरडून माझा घसा बसलाय, पण चेहऱ्यावरचं हास्य आता आठवडाभर जाणार नाही. आज तुम्ही अब्जावधी भारतीयांची मान अभिमानाने उंच केली आहे".
सनी देओलने आपल्या 'गदर' स्टाईलमध्ये "हिंदुस्तान झिंदाबाद" म्हणत संजू सॅमसन, इशान किशन, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, शिवम दुबे यांचे तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत टीम इंडियाला विजयाबद्दल अभिनंदन केले. तिने लिहिले, "शानदार विजय आणि सलग दोन विश्वचषक जेतेपद".
Web Summary : Bollywood stars erupted in celebration as India clinched the T20 World Cup. Shah Rukh Khan, Akshay Kumar, and others lauded the team's historic win and outstanding performance, expressing pride and joy.
Web Summary : भारत की टी20 विश्व कप जीत पर बॉलीवुड सितारों ने बधाई दी। शाहरुख खान, अक्षय कुमार और अन्य कलाकारों ने टीम के ऐतिहासिक प्रदर्शन की सराहना की और गर्व व्यक्त किया।