Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनल चौहानला पाहून प्रेक्षकांनी एका सूरात गायलं गाणं, वर्ल्डकप सामन्यावेळी मिळालं खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:42 IST

सोनलने व्हिडीओ शेअर करत छान पोस्टही लिहिली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० विश्वचषक अंतिम सामना अनेकांनी याची देही याचि डोळा अनुभवला. भारताने वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. काही बॉलिवूड सेलिब्रिटीही सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये होते. 'जन्नत' फेम अभिनेत्री सोनल चौहानला यावेळी खास सरप्राईज मिळालं. स्टेडियममधील प्रेक्षकांनी सोनलला ओळखले आणि तिच्या 'जन्नत' या सुपरहिट चित्रपटातील 'झरा सी दिल में दे जगा तू' हे गाणे एका सुरात गायला सुरुवात केली. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चाहत्यांच्या प्रेमाने सोनल भारावलीभारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये एकीकडे वर्ल्ड कपचा सामना रंगला होता. तर दुसरीकडे प्रेक्षकांची नजर काही प्रेक्षकांची नजर अभिनेत्री सोनल चौहानवर पडली. 'जन्नत' सिनेमातलं इमरान हाशमी आणि सोनल चौहानचं 'जरा सी दिल मे दे जगह तू' गाणं खूप गाजलं होतं. सामन्यादरम्यान सोनलला पाहून प्रेक्षकांना गाण्याची आठवण झाली आणि त्यांनी एकसूरात गाणं गायला सुरुवात केली. सोनल ते पाहून भारावूनच गेली. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले, "हा क्षण खूप खास होता. मी संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करु शकले नाही. पण ज्या प्रकारे तुम्ही सर्वांनी जरा सी.. गाणं गायलं त्याला तोड नाही. माझ्या चेहऱ्यावरचं हसूच सगळं काही सांगून जात आहे. धन्यवाद अहमदाबाद. आय लव्ह यू गुजरात. आय लव्ह यू ऑल. मला कायमच हसवत राहिल्याबद्दल सर्वांचे आभार."

दुबईतील संकटातून सुखरूप मायदेशीकाही दिवसांपूर्वी सोनल दुबईत अडकली होती. २८ फेब्रुवारी रोजी मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि इस्रायल-अमेरिका यांच्या हवाई हल्ल्यांमुळे दुबईतील विमान सेवा विस्कळीत झाली होती. परिणामी सोनल तिथे अडकून पडली होती. मायदेशी परतल्यानंतर तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना सुरक्षित असल्याची माहिती दिली आणि कठीण काळात मिळालेल्या प्रार्थनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

'जन्नत'च्या आठवणी आजही ताज्या२००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'जन्नत' चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. इमरान हाश्मी आणि सोनल चौहान यांची केमिस्ट्री आणि चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत, हे स्टेडियममधील त्या प्रसंगावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sonal Chauhan's 'Jannat' song surprise at India-New Zealand match.

Web Summary : During the India-New Zealand match, fans surprised actress Sonal Chauhan by singing 'Zara Si Dil Mein De Jagah Tu' from her movie 'Jannat'. Overwhelmed by the love, she shared a video expressing her gratitude. Earlier, Sonal had been stranded in Dubai due to flight disruptions.
टॅग्स :सोनल चौहानबॉलिवूडसंगीत