Join us

सुरजची बढती मांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 09:13 IST

चंदेरी पडद्यावर झळकण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण-तरुणी माया नगरी मुंबईची वाट धरतात. फार कमी लोकांचे हे स्वप्न सत्यात उतरते. ...

चंदेरी पडद्यावर झळकण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण-तरुणी माया नगरी मुंबईची वाट धरतात. फार कमी लोकांचे हे स्वप्न सत्यात उतरते. पण काही लोकांना याची किंमत कळत नाही. आता सुरज पांचोलीचेच उदाहरण बघा ना...इंडस्ट्रीमध्ये येऊन काही महिने झाले नाही की, त्याच्यामध्ये स्टार नखरे आले आहेत. प्रेक्षकांनी नाकारलेल्या ‘हीरो’ चित्रपटातून पदार्पन केलेल्या या पठ्ठ्याला त्याच्या अवास्तव मागणीमुळे हातच्या चित्रपटाला मुकावे लागले.अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन २’मध्ये सूरजची वर्णी लागली होती. आता या सुवर्ण संधीचे सोने करण्याचे सोडून त्याने दिग्दर्शक आणि निर्मात्यामागे करिना, दीपिका, प्रियंकासारखी आघाडीची नायिका घेण्याचे टुमणे लावले.त्याच्या मागण्यांना कंटाळून अखेर चित्रपटनिर्मात्याने त्याचीच फिल्ममधून हाकालपट्टी केली. यालाच म्हणतात, तेलही गेले आणि तुपही गेले.