Join us

फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:50 IST

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत.

Guess Who: इंटरनेटवर एक फोटो खूप लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एकत्र आहेत. फोटोत दिसणारी ही मुले आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही. या व्हायरल फोटोमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील 5 स्टार्स आहेत, पण त्यांना ओळखणे फार कमी लोकांना जमले आहे. हा ग्रुप फोटो कपूर कुटुंबाचा आहे. तुम्ही यापैकी काही ओळखू शकाल का?

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनम कपूर, रणबीर कपूर, अंशुला कपूर, अर्जुन कपूर, अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर फोटोत शेवटी बसलेला मुलगा ज्याने विक्ट्री साईन केलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून रणबीर कपूर आहे. अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत दिसत आहे.

 सोनमच्या शेजारी अर्जुन कपूर लाल टी-शर्टमध्ये चष्मा घातलेला आहे.  सोनमच्या मागे अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर एका मुलाला मांडीवर घेऊन बसली आहे. आता कपूर कुटुंबातील स्टार्सचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहे. फोटोवर कमेंट्सद्वारे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :सोनम कपूरअर्जुन कपूर