Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी 'धुरंधर' पाहिलेला नाही पण...", इम्तियाज अली यांची प्रतिक्रिया, टीमचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:12 IST

'धुरंधर'वर इम्तियाज अली काय म्हणाले?

Imtiaz ali on Dhurandhar: 'धुरंधर: द रिव्हेंज' सिनेमा १९ मार्च रोजी रिलीज झाला. पहिल्या दिवसापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित सिनेमाने एक बेंचमार्कच सेट केला आहे. बॉलिवूडमधून सिनेमावर अनेक प्रतिक्रिया आल्या. कोणी सिनेमाचं कौतुक केलं तर काहींनी यावर टीकाही केली. नुकतंच दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी सिनेमावर भाष्य केलं आहे. 

माध्यमांशी बोलताना इम्तियाज अली म्हणाले, "मी धुरंधर अद्याप बघितलेला नाही. पण मला कल्पना आहे की सिनेमा नक्कीच चांगला असेल. प्रेक्षक सिनेमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणल्याबद्दल सिनेमाच्या टीमचे मी आभार मानतो. हे असंच सुरु राहुदे हीच आशा आहे. धुरंधर टीमचं अभिनंदन."

'धुरंधर: द रिव्हेंज' १३ दिवसातच १००० कोटींच्या घरात पोहोचला आहे. सिनेमात रणवीर सिंहच्या कामाने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. जगभरात सिनेमाने १५०० कोटी पार केले आहेत. आदित्य धरच्या या सिनेमाने बॉलिवूडचे अच्छे दिन परत आले आहेत.

इम्तियाज अली सध्या 'मैं वापस आऊंगा' या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहेत. ही एक प्रेमकथा असल्याचे सांगितले जात असून, २०२४ मध्ये आलेल्या 'अमर सिंह चमकीला' या चित्रपटानंतर दिलजीत दोसांझसोबतचा इम्तियाज अली यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात वेदांग रैना, शर्वरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'मैं वापस आऊंगा'चा टीझर आधीच प्रदर्शित झाला असून, त्यातून १९४७ च्या फाळणीवर आधारित एका भावूक कथेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Imtiaz Ali Praises 'Dhurandhar' Success, Thanks Team Despite Not Seeing It

Web Summary : Imtiaz Ali lauded the film 'Dhurandhar' team for its box office success, despite not yet viewing it. He appreciated their effort in drawing audiences to theaters. The movie has grossed over ₹1000 crore within 13 days. Ali is currently working on 'Main Wapas Aaunga'.
टॅग्स :इम्तियाज अलीधुरंधर सिनेमाबॉलिवूड