Join us

​इमरानचा नकार कुणाला व का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 14:57 IST

आलिया भट्टचे नाव आज बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. मोठ मोठे दिग्दर्शक आलियासोबत काम करण्यास उत्सूक आहे. किंगखान शाहरूख ...

आलिया भट्टचे नाव आज बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. मोठ मोठे दिग्दर्शक आलियासोबत काम करण्यास उत्सूक आहे. किंगखान शाहरूख खानसोबतही लवकरच आलिया दिसणार आहे. पण असे असले तरी एक बॉलिवूड अभिनेता आलियासोबत काम करण्यास नकार देतोय. हा अभिनेता आहे, इमरान हाश्मी. इमरानला आलियासोबत एक फिल्म आॅफर केली गेली होती. मात्र इमरानने यास नकार दिला. आता इमरान व आलियात काहीही मतभेद वगैरे नाही. इमरानने हा चित्रपट नाकारला कारण यात इमरानला आलियासोबत पडद्यावर रोमान्स करायचा होता. आता आलिया ही इमरानची चुलत बहिण आहे. कझिन सिस्टरसोबत पडद्यावर रोमान्स करायला इमरान कसे बरे तयार होईल. त्याने नकार दिला. नकारच नाही तर हा चित्रपट आॅफर करणाºया मेकर्सचीही त्याने चांगलीच खरडपट्टी काढली.