Imran Khan: बॉलिवूड अभिनेता इमरान खान बरीच वर्षे अभिनयापासून दूर आहे. पण, लवकरच तो कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. तो व्यवसायिक आयुष्यासोबतच लव्हलाईफमुळेही चर्चेत असतो. पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्या आयुष्यात लेखा वॉशिंग्टनची एन्ट्री झाली आहे. लेखा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अशातच आता लेखा ही इमरान खानच्या मित्राचीच बायको होती, असं समोर आलं आहे. इमरान खान याने पत्नीला धोका दिला आणि मित्राच्या बायकोसोबतच विवाहबाह्य संबंध ठेवल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
इमरान खानने २०११ मध्ये अवंतिका मलिकशी लग्न केले आणि २०१९ मध्ये ते वेगळे झाले. यातच इमरान खान याचे नाव लेखा वॉशिंग्टनशी जोडले गेलं. बऱ्याच ठिकाणी दोघे एकत्र स्पॉट झाले. अशातच रेडिटवर एक पोस्ट व्हारल झाली. ज्यात इमरान खानने लेखासोबत लग्न केलयं? ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत? की वेगळे झालेत? असं विचारलं होतं. या पोस्टवरील एका कमेंटने लक्ष वेधून घेतलं.
एका युजरने कमेंट करत दावा केला की, "लेखा हिच्या लग्नात इमरान खान मुलाच्या बाजूने तर त्याची पत्नी अवंतिका ही मुलीच्या बाजूने होती. लेखाचा नवरा इमरान खान याचा सर्वात चांगला मित्र होता. त्याने त्याच्या मित्राचा विश्वासघात केला आणि त्याच्या पत्नीशी संबंध ठेवले, जे चुकीचे आहे. अशा लोकांसाठी नरकात एक खास जागा राखीव आहे जे केवळ त्यांच्या जिवलग मित्रांनाच नव्हे तर त्यांच्या जोडीदारांनाही विश्वासघात करतात. यामुळेच अवंतिका खूप नैराश्यातून गेली. लेखाच्या माजी पतीसोबतही असचं काही झालं असेल", असा दावा केलाय.
सध्या सगळीकडे इमरान खान आणि लेखा यांच्या नात्यावरुन चर्चा सुरु आहे. इमरान खान हा आमिर खानचा भाचा आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून तो लोकप्रिय झाला. आपल्या आकर्षक आणि देखण्या रूपाने त्याने सर्वांना वेड लावले. पण, यानंतर त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाले. पण, तो आता कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.