बॉलिवूड अभिनेता इमरान खान सध्या चर्चेत आहे. अनेक वर्षांनी तो स्क्रीनवर परतला आहे. मामा आमिर खाननेच निर्मिती केलेल्या 'हॅपी पटेल'मधून त्याने कमबॅक केलं आहे. एकेकाळी इमरान खानबॉलिवूडचा चॉकलेट हिरो होता. 'जाने तू या जाने ना', 'एक मै और एक तू', 'ब्रेक के बाद' अशा काही सिनेमांमध्ये तो दिसला. रणबीर कपूरसोबत त्याची स्पर्धा होती असं म्हणतात. आता रणबीरसोबतच्या क्लॅशवर इमरानने नुकतंच उत्तर दिलं आहे.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, "रणबीर आणि माझ्यात स्पर्धा आहे, आमच्यात क्लॅशेस आहेत अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या, वाचल्या. त्याच्या बातम्या झाल्या. मीडियातही अशा गोष्टी पसरवल्या गेल्या ज्यामुळे एक चांगली मैत्री होण्याआधीच नातं खराब झालं."
रणबीर कपूर आज इतका यशस्वी झाला यावरही इमरानने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी बरीच वर्ष झाली हिंदी सिनेमेच पाहिलेले नाहीत. अॅनिमलही पाहिलेला नाही त्यामुळे कोणाच्या यशावर मी बोलू शकत नाही. पण जेव्हा मी इंडस्ट्रीत काम करायचो तेव्हा मी रणबीरचे सगळे सिनेमे पाहिलेले आहेत. मी त्याला कायम एक स्ट्राँग अभिनेता म्हणून बघितलं आहे. मी त्याला जितकं ओळखतो त्यानुसार तो सिनेमाचा सखोल अभ्यास करणारा व्यक्ती आहे. अभिनय ही कला त्याच्याकडे उपजतच आहे आणि सोबतच त्याला सिनेमा ही भाषाही चांगल्या प्रकारे समजते."
दरम्यान इमरान खानच्या कमबॅकने त्याचे चाहते खूश झाले आहेत . 'हॅपी पटेल'मध्ये त्याचा कॅमिओ बघायला मिळाला होता. तर आता तो 'अधूरे हम अधूरे तुम'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Web Summary : Imran Khan, returning to the screen, addressed rumors of rivalry with Ranbir Kapoor. He stated media-fueled clashes prevented a friendship. Khan acknowledged Kapoor's acting talent and deep understanding of cinema. He is now appearing in 'Adhure Hum Adhure Tum'.
Web Summary : इमरान खान, स्क्रीन पर वापसी करते हुए, रणबीर कपूर के साथ प्रतिद्वंद्विता की अफवाहों पर बोले। उन्होंने कहा कि मीडिया द्वारा भड़काई गई झड़पों ने दोस्ती को रोक दिया। खान ने कपूर की अभिनय प्रतिभा और सिनेमा की गहरी समझ को स्वीकार किया। अब वह 'अधूरे हम अधूरे तुम' में दिखेंगे।