Join us  

९ वर्षांनंतर कमबॅक करतोय इमरान खान, सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 11:15 AM

तब्बल ९ वर्षांनी इमरान खान पुन्हा कमबॅक करत आहे. तो पुन्हा कमबॅक करणार असल्यामुळे चाहतेही उत्सुक आहेत.

'जाने तू या जाने ना' या सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेला आणि पदार्पणातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता म्हणजे इमरान खान. २००८ साली बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतलेल्या इमरानला पहिल्याच सिनेमाने लोकप्रियता मिळवून दिली. अनेक सिनेमांत काम करूनही त्या हवं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे गेल्या अनेक काळापासून इमरान सिनेसृष्टीपासून लांब होता. आता तब्बल ९ वर्षांनी तो पुन्हा कमबॅक करत आहे.

२०१५ साली प्रदर्शित झालेला 'कट्टी बट्टी' हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर इमरानने  बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. त्यानंतर इमरान कोणत्याच सिनेमात दिसला नाही. आता पुन्हा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हॅपी पटेल' असं इमरानच्या सिनेमाचं नाव असून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. इमरान खान पुन्हा कमबॅक करणार असल्यामुळे चाहतेही उत्सुक आहेत. 

पीपिंग मूनने दिलेल्या रिपोर्टनुसार, इमरान खान नव्या सिनेमासाठी जोरदार तयारी करत आहे. गोव्यात या सिनेमाचं शूटिंग होत आहे. इमरानच्या हॅपी पटेल सिनेमात आमिर खानही कैमिओ करताना दिसणार आहे. हा एक कॉमेडी जॉनरचा सिनेमा असून आमिर खान प्रोडक्शनकडून सिनेमाची निर्मिती होत आहे. 'हॅपी पटेल' सिनेमानंतर इमरान ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. एका वेब सीरिजामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :इमरान खानसेलिब्रिटीसिनेमा