Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला काही मोठा स्टार बनायचं नव्हतं...", १० वर्षांनंतर इमरान खानचं सिनेसृष्टीत कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:43 IST

इतकी वर्ष तो कुठे होता,  त्याने काम का केलं नाही अशा अनेक प्रश्नांवर आता त्याने उत्तरं दिली आहेत. 

अभिनेता इमरान खान बऱ्याच वर्षांनंतर स्क्रीनवर परतला आहे. आमिर खान निर्मित 'हॅपी पटेल' सिनेमातून त्याने कमबॅक केलं आहे. इमरान आमिरचा मामा आहे. मामाच्याच 'जाने तू या जाने ना' सिनेमातून त्याने पदार्पण केलं होतं. तर आता जवळपास १० वर्षांनंतर तो पुन्हा सिनेमात दिसत आहे.  इतकी वर्ष तो कुठे होता,  त्याने काम का केलं नाही अशा अनेक प्रश्नांवर आता त्याने उत्तरं दिली आहेत. 

'हॅपी पटेल' सिनेमा कसा मिळाला यामागची कहाणी नुकतीच इमरानने सांगितली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "गेल्या दोन वर्षांत मी अनेक स्क्रिप्ट वाचल्या. पण एकही स्क्रिप्ट आवडत नव्हती. २०२३ शेवटी मोठ्या ब्रेकनंतर मी पुन्हा सोशल झालो. तेव्हा सगळे म्हणाले, 'अरे हा माणूस जिवंत आहे'. सगळे माझ्याशी पुन्हा संपर्क साधायला लागले. पण मी याकडे आधीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहत होतो. प्रत्येकालाच आपल्या करिअरकडून एकसारख्याच गोष्टी नको असतात. प्रत्येकाचा वेगवेगळा रस्ता असतो. मला स्वत:ला मोठा स्टार बनायचं नव्हतं. ना मी टॉप तीन मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होतो. जोपर्यंत मला सिनेमा आवडत नाही आणि मला तो बनवण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत मी करणार नाही. मी तेव्हाच सिनेमा बनवेन जेव्हा मला काहीही गमावण्याची भीती नसेल."

"मी सिनेमे यासाठी केले जेणेकरुन मी माझ्या मित्रांसोबत मस्ती करु शकेन. मित्रांना एकत्र करुन मेकअप करायचं, कॉस्चुम बघायचे आणि भूमिका साकारायची या नजरेने मी सिनेमा निर्मितीकडे पाहतो. कला म्हणजे काय ज्यात प्रेम आणि मजा आहे. हॅपी पटेलची स्क्रिप्ट वाचून मला हेच वाटलं की एक मजेशीर कॉमेडी आहे. मी कोणतंही नरेशन ऐकलं नव्हतं. पण मित्रांकडून ऐकून मला मजा आली. मी वीरला मेसेज केला की मलाही तुमच्यासोबत यामध्ये काम करण्याची इच्छा आहे. तेव्हा त्याने लगेच माझ्यासाठी एक भूमिका लिहिली जी आधी स्क्रिप्टमध्ये नव्हती, तो म्हणाला, 'चला मजा करु'."

English
हिंदी सारांश
Web Title : Imran Khan Returns After 10 Years: 'Never Wanted to Be Star'

Web Summary : Imran Khan returns to cinema after a decade with 'Happy Patel,' driven by fun, friendship, and a disinterest in stardom. He chose roles offering enjoyment over fame, prioritizing camaraderie and creative fulfillment.
टॅग्स :इमरान खानबॉलिवूड