इमरान हाश्मी मिनी व्हॅकेशन्सवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:29 IST
इमरान हाश्मीचे ‘बॅक टू बॅक’ चित्रपट रिलीज पाहता त्याला एका ब्रेकची गरज होती. त्यामुळे तो सध्या गोव्याला मिनी व्हॅकेशन्ससाठी ...
इमरान हाश्मी मिनी व्हॅकेशन्सवर...
इमरान हाश्मीचे ‘बॅक टू बॅक’ चित्रपट रिलीज पाहता त्याला एका ब्रेकची गरज होती. त्यामुळे तो सध्या गोव्याला मिनी व्हॅकेशन्ससाठी गेला आहे. तो जवळपास एक आठवडा तेथील घरी राहणार आहे. खरंतर तो त्याच्या बालपणीच्या मित्रांसोबत गेट टूगेदर करणार आहे.त्याने २६ सप्टेंबरला मुंबई सोडली आणि आता तो आठवड्याच्या शेवटी परत कामावर रूजू होणार आहे. त्याच्यासोबत त्याची फॅमिली नाहीये. तो म्हणतो,‘गोव्याची ट्रीप मला पुन्हा एकदा फ्रेश करण्यास नक्की मदत करेल. जर वातावरण चांगले असेल तर नक्कीच मला बीचवर एन्जॉय करायला आवडेल. फक्त रिलॅक्स करण्याचाच माझा प्लॅन आहे.’