Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कह दूॅँ तुम्हें’च्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये दिसणार इमरान हाशमी अन् ईशा गुप्ताची हॉट केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 19:49 IST

सध्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा जणूकाही ट्रेंडच बनला आहे. पाचपैकी तीन चित्रपटांमध्ये तरी जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन ...

सध्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा जणूकाही ट्रेंडच बनला आहे. पाचपैकी तीन चित्रपटांमध्ये तरी जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन प्रेक्षकांना बघावयास व ऐकावयास मिळते. गेल्या काही काळातील चित्रपटांचा विचार केल्यास त्यामध्ये ‘ओके जानू’ (हम्मा हम्मा), ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ (तम्मा तम्मा) आणि ‘काबिल’ (सारा जमाना) या चित्रपटांमध्ये हा फॉर्म्युला वापरण्यात आल्याचे दिसून आले. आता असाच काहीसा फॉर्म्युला आगामी ‘बादशाहो’मध्ये बघावयास मिळणार आहे. १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘दीवार’ या सुपरहिट चित्रपटातील ‘कह दूॅँ तुम्हें’ हे गाणे नव्या व्हर्जनमध्ये प्रेक्षकांसमोर आणले जाणार आहे.  होय, अजय देवगण स्टारर ‘बादशाहो’मध्ये हे गाणे दिसणार असून, त्यामध्ये इमरान हाशमी आणि ईशा गुप्ता थिरकाताना दिसतील. या गाण्याचे ओरिजनल व्हर्जन शशी कपूर आणि नीतू कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. तर रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये इमरान आणि ईशा यांची केमिस्ट्री बघावयास मिळणार आहे. ओरिजनल गाण्यात स्वर्गीय किशोरकुमार आणि आशा भोसले यांचा आवाज ऐकावयास मिळाला; मात्र नव्या व्हर्जनमध्ये कोण गाणार याबाबतचा अद्यापपर्यंत खुलासा होऊ शकला नाही. मात्र या गाण्यात इमरान आणि ईशाला बघणे खूपच रोमॅण्टिक ठरेल यात शंका नाही. या अगोदर या दोघांना ‘बस इतना हंै तुमसे कहाना’ या गाण्यात प्रेक्षकांनी बघितले होते. या गाण्यात दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. आता पुन्हा एकदा अशाच अंदाजात ‘कह दूॅँ तुम्हें’च्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये हे दोघे प्रेक्षकांना बघावयास मिळतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आगामी ‘बादशाहो’मध्ये इमरान आणि ईशा व्यतिक्ति अजय देवगण, इलियान डिक्रूज, विद्युत जामवाल, संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मीलन लुथरिया यांनी केले आहे.