Join us

सुधर जाइए! चाहत्यांच्या वागण्याने संतापली रिचा चड्ढा !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 10:34 IST

अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणजे बॉलिवूडच्या काही बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक़  याच बिनधास्त अभिनेत्रीला काल काही अतिउत्साही चाहत्यांचा त्रास करावा लागला. ...

अभिनेत्री रिचा चड्ढा म्हणजे बॉलिवूडच्या काही बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक़  याच बिनधास्त अभिनेत्रीला काल काही अतिउत्साही चाहत्यांचा त्रास करावा लागला. रिचाने Twitter वरून याची माहिती दिली. या चाहत्यांना रिचाने मग धडा शिकवला नसेल तर नवल. हा किस्सा आहे, मुंबईच्या वांद्रयाचा. रिचा वांद्रयातून आपल्या कारने जात होती. याचदरम्यान काही चाहत्यांचे लक्ष तिचे गेले. या चाहत्यांनी काय करावे? तर रिचाचा बाईकवरून पाठलाग केला. रिचाला ऐनकेनप्रकारे गाठून तिच्यासोबत सेल्फी काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात या अतिउत्साही चाहत्यांना रिचाला गाठता आले नाही. पण या घटनेनंतर रिचाने त्या चाहत्यांना चांगलेच सुनावले. Twitterवर तिने याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली.‘वांद्रयात काही अतिउत्साही चाहत्यांनी बाईकवरून माझा पिच्छा पुरवला. तुमच्यासारखी मंडळी पादचारी आणि अन्य वाहनांच्या सुरक्षेसाठी धोका आहात. फोटो काढण्यासाठी विचारण्याची ही कुठली पद्धत आहे? सुधरा...’, असे रिचाने लिहिले. बॉलिवूड सेलिब्रिटींचा आॅटोग्राफ मिळवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते त्यांचा पाठलाग करताना दिसतात. आता रिचाची ही फटकार चाहत्यांच्या डोक्यात किती प्रकाश पाडते, ते बघूच.रिचा चड्ढाने ‘ओए लकी लकी ओए’ या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘गँग्स आॅफ वासेपूर’,‘फुकरे’, ‘मसान’ यांसारख्या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या. रिचाने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसल्याने बॉलिवूडमध्ये स्थिरावणे तिला बरेच जड गेले. पण रिचाने स्वबळावर यश मिळवले. ALSO READ : ​पुन्हा परतली ‘फुकरे’ गँग...पाहा, ‘फुकरे रिटर्न्स’चा ट्रेलर!!रिचा लवकरच तिच्या आगामी ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळणार आहे. तिचा हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात पुलकित सम्राट, अली जफर आणि मनजोत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चुचा म्हणजेच वरुण शर्मा पुन्हा एकदा भविष्यात घडणाºया घटनांचे स्वप्न बघणार आहे, तर भोली पंजाबन म्हणून पुन्हा एकदा रिचा दमदार भूमिकेत दिसणार आहे.