Join us

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 16:27 IST

एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्यामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककाळ पसरली आहे. छोट्या पडद्यापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.  एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले.  या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.

काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी सुसाईड नोट मिळालेली नाही.  न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार पोलिसांना सुशांतच्या घरात काही वैद्यकीय कागदपत्र मिळाली आहेत गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता आणि त्यावर तो उपचारसुद्धा घेत होता. मात्रयाच दरम्यान त्याने टोकाचं पाऊल उचलले. 

सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. शेवटचा सुशांत  नेटफ्लिक्सच्या ड्राईव्ह या सिनेमाच झळकला होता.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत