Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी अजून लहान-बेबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:14 IST

करिना कपूर खान म्हणते,‘ मी अजून दिग्दर्शकाची अभिनेत्री असून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात लहान आहे. आर. बल्की दिग्दर्शित चित्रपट ‘की अ‍ॅण्ड ...

करिना कपूर खान म्हणते,‘ मी अजून दिग्दर्शकाची अभिनेत्री असून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात लहान आहे. आर. बल्की दिग्दर्शित चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ मध्ये प्रथमच तिने प्रसिद्ध निर्मात्यासोबत काम केले आहे. तिने या चित्रपटासाठी कोणती मेहनत घेतली याविषयी विचारण्यात आले असता ती म्हणाली की,‘ मी दिग्दर्शकाची अभिनेत्री आहे. मी आत्तापर्यंत दर्जेदार दिग्दर्शकांसोबत बेस्ट काम केले आहे. आणि वाईट दिग्दर्शकांसोबत वाईट पद्धतीने काम केले आहे. माझे दिग्दर्शक मला त्या मार्गाने घेऊन गेले. त्यामुळे मी अद्याप लहान आहे.’ ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग प्रसंगी करीना कपूर खान असे म्हणाली. त्यानंतर तिच्या अभिनयावर भाळलेले दिग्दर्शक आर. बल्की म्हणाले,‘ खरंतर ती एक खुप चांगली अभिनेत्री आहे. तिचा जन्म या इंडस्ट्रीतच झाला आहे. ती साधारण तयारी करत नाही. अगोदर स्क्रिप्ट वाचून समजून घेते. मी फक्त तिला चित्रपटासाठी होकार दिला.’