Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी निसासारखीच...', अभिनेत्री काजोलच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:20 IST

Kajol : काजोलची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री काजोल (Kajol) आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक वर्षे तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  गाजवले आहे. तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या दोन्ही मुले, पतीबद्दलचं प्रेम सोशल मीडियावरून व्यक्त करत असते. आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

काजोल हल्ली फार चित्रपटांमध्ये काम करताना दिसत नाही. पण या तिच्या निर्णयामुळे तिचा फॅन फॉलोव्हिंग कमी झालेला नाही. काजोलही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने तिच्यामध्ये आणि तिच्या मुलीमध्ये तिला काय साम्य दिसले सांगितले आहे.

काजोलने नुकताच AIने (आर्टिफिशियल इंटेलिजन्सने) तिचा बनवलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती तिची मुलगी निसासारखी दिसते, असे ती म्हणाली. या फोटोमध्ये तिने निसाला टॅग करत लिहिले की, AI आणि मी… तुम्ही ओळखू शकता का मी कोणासारखी दिसते? या फोटोमध्ये मी ज्या व्यक्तीला टॅग केलं आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तिची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून यावर रिएक्शन देत तिचे चाहते तिचा हा फोटो आवडल्याचे आणि तिच्यात आणि निसामध्ये खरोखर साम्य दिसत असल्याचे सांगत आहेत.

टॅग्स :काजोल