Join us

मी अँक्शन हिरो- जॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:49 IST

अँक्शन, कॉमेडी आणि ड्रामा यात मास्टरी मिळवलेला जॉन अब्राहम स्वत:ला एक उत्तम अँक्शन हिरो समजतो. 'मद्रास कॅफे' स्टार जॉन ...

अँक्शन, कॉमेडी आणि ड्रामा यात मास्टरी मिळवलेला जॉन अब्राहम स्वत:ला एक उत्तम अँक्शन हिरो समजतो. 'मद्रास कॅफे' स्टार जॉन म्हणाला,' मला जरी शूटिंगदरम्यान अनेक दुखपती झाल्या असतील तरीही अँक्शन सीन्सच मला बेहद आवडतात. मला नुकत्याच गुडघ्याच्या दुखापती झाल्या आहेत. पण ते ठीक आहे. मी फीट, स्ट्राँग आणि फास्टर आहे. मी जर डान्सर असलो असतो तर मला कधीही लागले नसते. नवनवीन ड्रेस घालणे आणि डान्स करणे हे सोपे आहे, पण अँक्शन सीन करणे फारच कठीण आहे. जर तुमचा धर्म फिटनेस आहे, तर तुम्ही जीम आणि वॉकिंगसाठी गेलंच पाहिजे. फीटनेस हा एक महत्त्वाचा धर्म आहे.