Join us
Daily Top 2Weekly Top 5

इलियाना डिक्रूझने फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसी ग्लो, चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:11 IST

इलियाना डिक्रूझने बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट केला आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयातून खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली इलियाना डिक्रूझ तिच्या बेबी बम्पचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. इलियाना डिक्रूझने पुन्हा एकदा तिचा मिरर सेल्फी शेअर केला आहे ज्यामध्ये ती बेबी बम्प फ्लॉन्ट दाखवताना दिसत आहे. इलियाना डिक्रूझचा सेल्फी चाहत्यांना खूप आवडते आणि प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

इलियानने शेअर केला फोटो इलियाना डिक्रूझने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये इलियाना डिक्रूझ मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. इलियाना डिक्रूझनेही बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बम्प फ्लॉंट केला आहे. इलियाना डिक्रूझने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले, 'माय लिटिल' इलियाना डिक्रूझची हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'मी खूप आनंदी आहे.' एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तू खूप सुंदर आहेस.' एका चाहत्याने लिहिले आहे, 'अभिनंदन.

इलियाना डिक्रूझने अलिकडेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर तो व्हायरल झाला होता. इलियाना एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आई होणार असल्याची माहिती दिली होती. लग्न न करताच गरोदर राहिलेली इलियाना त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत होती. इलियानाच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मा त्यानंतर इलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो शेअर केले होते.

टॅग्स :इलियाना डीक्रूज