Join us

हाय गरमी! लाल रंगाच्या बिकीनीत सुपरहॉट दिसत आहे इलियाना डिक्रूज, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:26 IST

Ileana D'Cruz Hot Photo : इलियानाने तिचा हा हॉट फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा फोटो शेअऱ करत कॅप्शनमध्ये इलियानाने हार्ट इमोजी शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D'Cruz) ने सोशल मीडियावर एका असा फोटो शेअऱ केलाय जो आता व्हायरल झाला आहे. या फोटोत इलियाना एका लाल रंगाच्या बिकीनीत दिसत आहे. इतकंच नाही तर यात ती सुपरहॉट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा हॉट अंदाज पाहून फॅन्सही अवाक् झाले आहेत. इलियानाने तिचा हा हॉट फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा फोटो शेअऱ करत कॅप्शनमध्ये इलियानाने हार्ट इमोजी शेअर केला आहे.

या फोटोत इलियानाचा अंदाज फारच कूल आहे. सोबतच अभिनेत्रीची हेअरस्टाइलही तिला सूट करत आहे. फॅन्सनी या फोटोवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच कमेंट्स करून तिचं भरभरून कौतुकही करत आहेत. इलियाना बऱ्याच काळापासून सिनेमात दिसली नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच तिच्या बिकीनी फोटोंमुळे चर्चेत असते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती अखेरची 'द बिग बुल' सिनेमात दिसली होती. ज्यात तिने मीरा राव नावाच्या जर्नलिस्टची भूमिका साकारली होती. या अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होता. इलियाना लवकरच 'अनफेयर एंड लवली' (Unfair And Lovely) मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासोबतच एका रोमॅंटिक-कॉमेडी सिनेमातही दिसणार आहे. त्यात विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांच्याही भूमिका आहेत. 

इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या बिकीनी फोटोंचीही चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी ती मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत होती. इलियानाचं तिच्या परदेशी बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअप झाल्यापासून ती सध्या सिंगल आहे.  

टॅग्स :इलियाना डीक्रूजबॉलिवूडसोशल व्हायरलसेलिब्रिटी