Join us

कोरोनाकाळातही भटकंती करतेय इलियाना डिक्रुज, या देशात करतेय व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 19:27 IST

इलियाना डिक्रूझची स्टाईल आणि लूक खूपच सुंदर दिसत आहे. इलियानाच्या या फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 'रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या व्हॅकेेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चित्रपटांसोबत ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखली जाते. इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती फिजीमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये इलियाना डिक्रूझची स्टाईल आणि लूक खूपच सुंदर दिसत आहे. इलियानाच्या या फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इलियानाने यावेळी निळ्याशार समुद्राकाठी निळ्या रंगाची बिकीन घातली आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. आतापर्यंत जवळपास ४ लाख लोकांनी तिच्या या फोटो पाहिला असून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. शेअर केलेल्या फोटोत इलियानाच ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फुल ऑन फिदा झाले आहेत. 

ही पहिली वेळ नाही याआधीही अशाप्रकारे ग्लॅमरस फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कमीत कमी मेकअप, विस्कटलेले केस आणि तितकाच ग्लॅमरस अंदाजातील इलियाने फोटो लक्षवेधी ठरतात.तिच्या हॉट आणि ग्लॅमरस  लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.त्यामुळे सोशल मीडियावर प्राजक्ताचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तसेच लॉकडाऊनमध्ये घरातच  बंदिस्त असल्यामुळे इलियानाला तिचे व्हॅकेशनचे दिवस आठवत होते. या काळात ती सगळ्यात जास्त समुद्र किना-यावर मजा मस्ती मिस करत होती. त्यामुळे कधी कोरोनाचे संकट दूर होणार आणि पु्न्हा पूर्वीसारखे मोकळा श्वास घ्यायला मिळणार याच्याच प्रतिक्षेत इलियाना होती. सध्या कोरोनाचे संकट अजूनही दूर झाले नसले तरी मनात कसलीही भीती न बाळगता सध्या ती भटकंती करत आहे. यावेळी सुरक्षेविषयीची खबरदारी घेत ती बाहेर भटकंती करताना पाहायला मिळतंय.

टॅग्स :इलियाना डीक्रूज