Join us
Daily Top 2Weekly Top 5

IIFA Awards 2017 : ​नामांकने जाहिर, ‘ऐ दिल है मुश्किल’ला सर्वाधिक नामांकने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 14:41 IST

यंदाच्या आयफा पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. ...

यंदाच्या आयफा पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. याचदरम्यान आयफा अवार्डच्या पॉप्युलर कॅटगिरीचे काही नॉमिनेशन्सही रिलीज करण्यात आले आहेत. या नॉमिनेशन्समध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने अनेक श्रेणीत नामांकने मिळवली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून तर सर्वोत्कृष्ट कलाकारांपर्यंतच्या श्रेणीत या चित्रपटाचा समावेश आहे. या सगळ्यांत एक विशेष म्हणजे, अक्षय कुमार आणि आमिर खान या दोघांच्या कुठल्याही चित्रपटाला कुठल्याही श्रेणीत नामांकन मिळालेले नाही. अक्षय कुमारचा ‘रूस्तम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. केवळ गाजलाच नाही तर यातील भूमिकेसाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेय. आमिर खानचे म्हणाल तर त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने एक नवे किर्तीमान स्थापित केले आहे. ‘दंगल’ हा यावर्षीचा सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट घोषित करण्यात आला आहे. असे असूनही आमिर व अक्षय या दोघांना आयफाच्या कुठल्याच कॅटेगिरीत नॉमिनेशन नाही. अक्षय व आमिर वगळता सलमान खानचा ‘सुल्तान’, शाहरूख खानचा ‘फॅन’, सोनम कपूरचा ‘नीरजा’, सुशांत सिंह राजपूतचा ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटांना अनेक कॅटेगिरीत नामांकन मिळले आहे.रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला सर्वाधिक चार श्रेणीत नामांकने मिळाली आहेत. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट  अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक अशा श्रेणींचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट  अभिनेत्याच्या श्रेणीत शाहिद कपूर(उडता पंजाब), रणबीर कपूर(ऐ दिल है मुश्किल), शाहरूख खान (फॅन), सुशांत सिंह राजपूत( धोनी: द अनटोल्ड स्टोरी), अमिताभ बच्चन (पिंक) या सर्वांना नामांकन मिळाले आहे. आता या पुरस्कारांवर कुणाचे नाव कोरले जाते, ते आपण बघणार आहोच.नामांकने! सर्वोत्कृष्ट चित्रपटऐ दिल है मुश्किलएम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरीनीरजासुल्तानउडता पंजाबसर्वोत्कृष्ट अभिनेताशाहिद कपूर(उडता पंजाब) रणबीर कपूर(ऐ दिल है मुश्किल)शाहरूख खान (फॅन)सुशांत सिंह राजपूत( धोनी: द अनटोल्ड स्टोरी)अमिताभ बच्चन (पिंक)सलमान खान (सुल्तान) सर्वोत्कृष्ट  अभिनेत्रीअनुष्का शर्मा (ऐ दिल है मुश्किल)आलिया भट्ट (डियर जिंदगी आणि उडता पंजाब)सोनम कपूर (नीरजा)तापसी पन्नू (पिंक)सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शककरण जोहर (ऐ दिल है मुश्किल)नीरज पांडे (एम एस धोनी)राम माधवानी (नीरजा)अनिरूद्ध राय चौधरी (पिंक)अली अब्बास जफर (सुल्तान)अभिषेक चौबे (उडता पंजाब)सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेतारजत कपूर (कपूर अ‍ॅण्ड सन्स)राजकुमार राव (अलिगढ)ऋषी कपूर (कपूर अ‍ॅण्ड सन्स)अनुपम खेर (एम एस धोनी)अमिताभ बच्चन (वजीर)सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्रीशबाना आझमी(नीरजा)अ‍ॅन्ड्रे तरिंग (पिंक)रत्ना पाठक शहा (कपूर अ‍ॅण्ड सन्स)दिशा पटनी (एम एस धोनी)रिचा च्ड्ढा (सरबजीत)सर्वोत्कृष्ट खलनायकनील नितीन मुकेश (वजीर)शाहरूख खान (फॅन)जीम सरभ (नीरजा)