IIFA 2017 : Watch Video : ‘बुमरॅँग’ व्हिडीओमध्ये डॅडी शाहिद कपूरसोबत पहा मीशाचा क्युट अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 18:49 IST
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याचा परिवार सध्या न्यू यॉर्क येथे सुरू असलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सहभागी झाले आहेत.
IIFA 2017 : Watch Video : ‘बुमरॅँग’ व्हिडीओमध्ये डॅडी शाहिद कपूरसोबत पहा मीशाचा क्युट अंदाज!!
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याचा परिवार सध्या न्यू यॉर्क येथे सुरू असलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सहभागी झाले आहेत. वास्तविक शाहिद याअगोदर बºयाचदा आयफामध्ये सहभागी झाला आहे. परंतु त्याची पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मीशा पहिल्यांदाच आयफामध्ये सहभागी झाले आहेत. मुंबई येथून निघाल्यापासूनच शाहिद आणि त्याची मुलगी मीशा यांच्यातील केमिस्ट्री बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आयफाने यावेळी आपल्या लाडकीचा चेहरा न लपविता बिनधास्तपणे तिला माध्यमांसमोर आणले. शिवाय तिच्यासोबतचे मस्तीच्या मुडमधील काही व्हिडीओज्देखील तो शेअर करीत आहे. नुकताच त्याने आपल्या ११ महिन्यांच्या लाडकीसोबतचा एक बुमरॅँग व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिदने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्रेकफास्ट शुगर रश’व्हिडीओमध्ये मीशा डॅडी शाहिदच्या कडेवर असून, डॅडीच्या फेव्हरेट गॉगलबरोबर ती खेळत आहे. शाहिददेखील फनी मुडमध्ये बघावयास मिळत आहे. एका पाठोपाठ एक फनी फेसेस तो बनविताना दिसत आहे. दोघेही या फोटोमध्ये क्युट दिसत असल्याने त्यांच्या चाहत्यांकडून हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. शिवाय शाहिदच्या चाहत्यांकडूनच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही केला जात आहे. महिनाभरानंतर मीशाचा बर्थ डे सेलिब्रेट केला जाणार असून, मम्मी मीरा आणि शाहिद यासाठी विशेष प्लॅन करीत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच शाहिद आणि मीराच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघांनी अतिशय साध्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला होता. मात्र मीशाचा बर्थ डे धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्याचा प्लॅन मीरा करीत आहे. सूत्रानुसार प्री-बर्थ डेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.