IIFA 2017 exclusive : सलमान खान, सोनाक्षी सिन्हाच्या फॅन्सची आयफामध्ये धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 11:29 IST
बॉलिवूड सेलिब्रेटींची फॅन्स हे जगभरात सगळीकडे आहेत. हे काय वेगळे सांगायला नको. न्यूयॉर्क ही त्याला अपवाद नाही.याचा प्रत्यय नुकताच ...
IIFA 2017 exclusive : सलमान खान, सोनाक्षी सिन्हाच्या फॅन्सची आयफामध्ये धूम
बॉलिवूड सेलिब्रेटींची फॅन्स हे जगभरात सगळीकडे आहेत. हे काय वेगळे सांगायला नको. न्यूयॉर्क ही त्याला अपवाद नाही.याचा प्रत्यय नुकताच आला. सध्या बॉलिवूडमधील सगळीच कलाकार मंडळी न्यूयॉर्कमध्ये 18 व्या आयफा अॅवॉर्डसाठी दाखल झालेले आहेत. संपूर्ण न्यूयॉर्क हे बॉलिवूडमय झाले आहे. संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींची चर्चा आहे. त्यामुळे न्यूयॉर्क शहरात सध्या आयफाचे वारे घुमतायेत. एअरपोर्टवरच्या इमिग्रेशनपासून ते हॉटेल्सपर्यंत कोण कोण बॉलिवूड स्टार्स आले आणि कोण आले नाहीत याची चर्चा सुरु आहे. नुकतेच आयफाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आयफाचे प्रमुख ही उपस्थित होते. यावेळी न्यूयॉर्कमध्ये बॉलिवूड कलाकारांबद्दल असलेले प्रेम जाणवले. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी अमेरिकेतील भारतीय फॅन्स आपल्या कुटुंबासह स्टार्सना भेटण्यासाठी आले होते. सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि अनिल कपूरचा यांना भेटण्यासाठी त्यांच्या फॅन्समध्ये खास उत्सुकता दिसली. अनुमप खेर यांनी पत्रकार परिषदेला सगळ्यात आधी हजेरी लावली. यावेळी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. असेच एक भारतीय वंशाचे फॅन्स आनंद अग्रवाल यांच्याशी आमची भेट झाली. ते आपल्या 3 वर्षांची मुलगी जिआ आणि मैत्रिण दीपिका म्हाजू यांच्यासोबत आले होते. सलमान खान आई हेलनसह आयफा अॅवॉर्डसाठी दाखल झाला आहे. सलमानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ ही न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे. दोन दिवसांनी कॅटरिनाचा बर्थ डे देखील आहे. त्यामुळे कॅटरिना हा बर्थ डे सलमानसोबत सेलिब्रेट करणार का ? असा प्रश्न त्यांच्या फॅन्सना नक्कीच पडला असेल.