Join us

IIFA 2017:Exclusive ए.आर रेहमान यांच्या कॉन्सर्टची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 15:02 IST

न्यूयॉमध्ये 18व्या आयफा पुरस्कार सोहळ्याची धूम पाहायला मिळत आहे.बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या सोहळ्यासाठी इथं दाखल झाले आहेत. मात्र पावसाचा ...

न्यूयॉमध्ये 18व्या आयफा पुरस्कार सोहळ्याची धूम पाहायला मिळत आहे.बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या सोहळ्यासाठी इथं दाखल झाले आहेत. मात्र पावसाचा फटका आयफा पुरस्कार सोहळ्यालाही बसला आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात ऑस्कर पुरस्कार विजेता गायक ए.आर. रेहमान परफॉर्म करणार आहे.१३ ते १५ जुलैदरम्यान या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचीही आखणी करण्यात आली आहे. त्यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे ग्रॅमी पुरस्कार विजेता ए.आर.रेहमान यांच्या संगीत कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणार ‘आयफा रॉक्स’. या पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयफा रॉक्सचं आयोजन करण्यात आलं होते.त्यासाठी सगळेच उत्सुक होते.  मात्र पावसामुळे ग्रीन कार्पेट सोहळाच रद्द होण्याची दाट शक्यता आहे.रेहमानसोबत मोठ्या संख्येने त्याचे सहकारी या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. 30 जणांच्या या क्रू मेंबरमध्ये संगीतकार, डान्सर्स आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. मुंबई आणि लॉस एंजिलिसमधून हे सगळे जण या खास परफॉर्मन्ससाठी आले आहेत. या सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी दोन दिवसांपासून रेहमान आणि त्यांच्या सहका-यांचा जोरदार सराव सुरु आहे. लंडनमधील रेहमानच्या कॉन्सर्टमधून संगीतप्रेमींनी काढता पाय घेतला होता. रेहमाननं मोजकीच हिंदी गाणी सादर केल्यामुळे लंडनमधील संगीत रसिक नाराज झाले होते. त्यामुळे न्यूयॉर्कमधील रेहमानच्या कॉन्सर्टला कसा प्रतिसाद मिळतो याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात. मात्र न्यूयॉर्कमधील संगीत रसिक मात्र रेहमानच्या कॉन्सर्टविषयी एक्साईटेड आहेत. या कॉन्सर्टची तिकीटं आणि पास मिळवण्यासाठी मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.