Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुलकितचे लग्न तुटण्यामागे यामी नाही तर मग आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 19:47 IST

अभिनेता पुलकित सम्राट पत्नी श्वेता रोहिरापासून विभक्त झाला तेव्हापासून हे लग्न तुटण्यामागे अभिनेत्री यामी गौतम असल्याचे मानले जाते. मात्र ...

अभिनेता पुलकित सम्राट पत्नी श्वेता रोहिरापासून विभक्त झाला तेव्हापासून हे लग्न तुटण्यामागे अभिनेत्री यामी गौतम असल्याचे मानले जाते. मात्र पुलकितला हा आरोप मान्य नाही. माझे लग्न तुटण्यामागे यामी नाही तर आणखीच कुणी आहे, असे अलीकडे पुलकितने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पुलकित व यामी यांच्यातील जवळीक वाढली तशी पुलकित व श्वेता यांच्यातील भांडणेही वाढली. ‘सनम रे’च्या सेटवर पुलकित व यामी हे दोघे  परस्परांच्या जवळ आल्याचे कळते. यानंतर ‘जुनूनीयत’मध्येही यामी व पुलकित एकत्र दिसले. साहजिकच पुलकित व श्वेताचे नाते तुटण्यामागे यामीला जबाबदार धरले जात आहे. या मुद्यावर पुलकित आत्तापर्यंत मौन बाळगून होता. पण आता त्याने मौन तोडले आहे. श्वेतासोबतचे नाते तुटण्यामागे यामी नाही तर श्वेताची आई(पुलकितच्या सासूबाई) कारणीभूत आहे, असे त्याने सांगितले. श्वेताच्या आईची आमच्या आयुष्यातील ढवळाढवळ जरा जास्तच वाढली होती. कुठलाही निर्णय श्वेताचा नाही तर तिच्या आईचा असायचा. याचमुळे आमच्या नात्यातील गोडवा हळहळू संपला, असे पुलकितने सांगितले. वेल, पुलकित खरे काय ते आम्ही काय सांगणार..आम्ही फक्त तुला शुभेच्छा तेवढ्या देणार!