करिना कपूरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आहे एक निराशाजनक बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 10:18 IST
करिना कपूर खान सध्या लाडक्या तैमूरसोबत वेळ घालवते आहे. सोबतच कामावर परतण्याच्या तयारीत आहे. येत्या सप्टेंबरपासून करिना ‘वीरे दी ...
करिना कपूरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आहे एक निराशाजनक बातमी!!
करिना कपूर खान सध्या लाडक्या तैमूरसोबत वेळ घालवते आहे. सोबतच कामावर परतण्याच्या तयारीत आहे. येत्या सप्टेंबरपासून करिना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करतेयं. त्यापूर्वी करिनाचा सगळा वेळ सध्या जिममध्ये जातोयं. प्रेग्नंसीदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना धडपडते आहे.गेल्या तीन महिन्यांपासून करिना जिममध्ये प्रचंड मेहनत करतेय. ती कडक डाएटवर आहे. प्रेग्नंसीदरम्यान करिनाचे १८ किलो वजन वाढले होते. गत तीन महिन्यांत करिनाने १६ किलो वजन कमी केले आहे. पण इतके पुरेसे नाहीच मुळी. कारण करिनाला एकूण १९ किलो वजन कमी करायचेयं. आम्हाला पूर्ण खात्री आहे, करिना तिचे हे टार्गेट नक्की पूर्ण करणार आणि ‘वीरे दी वेडिंग’मधून पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतणार. निश्चितपणे करिनाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. पण त्यासोबतच एक काहीशी दु:खी-खिन्न करणारी एक बातमीही आमच्याकडे आहे. होय, करिनाने आता आमिर खानच्या मार्गावर चालण्याचे ठरवले आहे. म्हणजेच, करिना यापुढे केवळ वर्षातून एक चित्रपट करणार आहे. तैमूरला अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी करिनाने हा निर्णय घेतला आहे म्हणे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आई झाल्यानंतर करिना केवळ काही निवडक चित्रपट करणार आहे. म्हणजेच, करिना दरवर्षी केवळ एक चित्रपट करणार.नक्कीच ही बातमी करिनाच्या चाहत्यांची निराशा करणारी आहे. पण शेवटी तैमूर यापेक्षा करिनासाठी काहीही मोठे नाही. त्यामुळे तैमूरसाठी करिना हा निर्णय घेत असेल तर तिच्या या निर्णयाचा आदर व्हायलाच हवा. होय ना?ALSO READ : ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना कपूर ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स!