अभिषेक बच्चनचे चाहते असाल तर वाचा, एक आनंदाची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 16:29 IST
अभिषेक बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अभिषेकचे करिअर संपले, असे वाटत असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली ...
अभिषेक बच्चनचे चाहते असाल तर वाचा, एक आनंदाची बातमी!
अभिषेक बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अभिषेकचे करिअर संपले, असे वाटत असतानाच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. उण्यापु-या दोन वर्षांनंतर ‘मनमर्जियां’ या चित्रपटात अभिषेक दिसणार आहे. खुद्द अभिषेकने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चित्रपटाचे आणि दिग्दर्शकाचे नाव असलेला फोटो त्याने पोस्ट केला आहे. हा चित्रपट अनुराग कश्यप दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात एक लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिषेक यात लीड रोलमध्ये दिसेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात आयुष्यमान खुराणा व भूमी पेडणेकर लीड रोलमध्ये दिसणार, अशी बातमी आली होती. पण काही कारणास्तव ही स्टारकास्ट बाद झाली आणि हा चित्रपट अभिषेकच्या नावावर चढला. अभिषेकसोबत यात तापसी पन्नू व विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. लवकरच अभिषेक शूटींग सुरु करणार आहे. साहजिकच अभिषेक कमालीचा उत्सूक आहे. अभिषेक या चित्रपटाद्वारे वापसी करतोय म्हटल्यावर चाहतेही तेवढेच उत्सूक आहेत.ALSO READ : अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला सोडून कॅटरिना कैफला म्हटले ‘आय लव्ह यू’! वाचा, नेमके काय आहे प्रकरण!! अभिषेकने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या करियरचा ग्राफ चांगलाच ढासळला होता. ‘हाऊसफुल3’ नंतर अभिषेक कुठेही दिसला नाही. या चित्रपटानंतर काहीदिवस ब्रेकवर असल्याचे त्याने सांगितले होते. पण हा ब्रेक संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. मध्यंतरी अभिषेकने चार सिनेमे साईन केल्याचीही चर्चा होती. पण ही चर्चाही निव्वळ चर्चाचं ठरली. अलीकडे अभिषेकच्या करिअर ग्राफ उंचावण्यासाठी ऐश्वर्याने सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची निवड केली असल्याची चर्चा होती. आता हे खरे असेल तर रेश्माच्याच पायगुणाने अभिषेकच्या हाताला काम मिळाले, असे म्हणायला हरकत नाही.