Join us

तर सलमान खान टायगर जिंदा है मध्ये दिसणाऱ्या अशा लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:43 IST

सलमान खान सध्या टायगर जिंदा है च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर नुकताच कॅटरिना कैफ या चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर ...

सलमान खान सध्या टायगर जिंदा है च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर नुकताच कॅटरिना कैफ या चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, चित्रपटातील गाण्याचे शूटिंग अजून बाकी आहे. त्यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम ग्रीसमध्ये एका आयलंडवर आहे. हा चित्रपट येत्या ख्रिसमसला म्हणजे २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सलमान आणि कॅटरिनाची जोडी तब्बल पाच वर्षांनी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सलमान खानने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर केला आहे त्यात तो काळ्या रंगाच्या जीन्स आणि टी शर्टमध्ये दिसतो आहे. त्यात सलमान टायगर जिंदा है चित्रपटातील लूकमध्ये दिसतो आहे. टायगर जिंदा है मध्ये त्याची भूमिका चांगलीच स्टायलिश आणि ऍक्शन ने भरलेली असणार आहे.टायगर जिंदा है हा चित्रपट २०१२ मध्ये आलेला एक था टायगरचा  सिक्वेल आहे. खरतर या चित्रपटाची कथा पूर्णपणे नवीन असल्याचा दावा चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास जफरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या आपल्या मुलाखतीत केला आहे. एक था टायगर चित्रपटानंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ तब्बल पाच वर्षानी ह्या चित्रपटात एकत्र काम करत आहे, यावरून हे मात्र नक्की की या चित्रपटात भरपूर अॅक्शन, रोमांस आणि ड्रामा असणार आहे. या चित्रपटाकडून सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीला खूप अपेक्षा आहेत. दोघांचे ही मागचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यामुळे दोघे ही एका हिटच्या शोधात आहे.  ALSO READ :  सन २०१९ची ‘ईद’ही ‘भाईजान’ सलमान खानच्या नावावर बुक! रिलीज होणार ‘हा’ चित्रपट!!यानंतर कॅटरिना कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर सलमान खान रेमो डिसोझाच्या 'रेस ३'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे.